स्कूल व्हॅन चालकाचे आठवीच्या विद्यार्थिनीवर प्रेम, घरात एकत्र आढळल्यानंतर आईकडून चोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीवर प्रेम, घरात एकत्र आढळल्यानंतर आईकडून चोप

नागपूर : दहावीत असलेल्या विद्यार्थिनीला स्कूल व्हॅनचा चालक रोज शाळेत नेत होता. यादरम्यान चालकाने त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या घरात तो नको त्या अवस्थेत सापडल्यानंतर मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी (Sakkardara Police) गुन्हा दाखल (Nagpur Crime) करून अटक केली. निखिल आत्राम (२१, रा. सावनेर) असे व्हॅन चालकाचे नाव आहे.

हेही वाचा: मित्राच्या पत्नीवरच वारंवार बलात्कार, पतीला सोडण्यासाठी तगादा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्करदरा परिसरात राहणारी पीडित १५ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) दहावीत शिकते. आरोपी निखिल आत्राम हा स्कूल व्हॅन चालक असून तो आपल्या मामाकडे नागपुरात राहतो. गेल्या दोन वर्षांपूर्वी तो विद्यार्थ्यांना शाळेत सोडून देत होता. त्याच स्कूल व्हॅनमध्ये रियासुद्धा ये-जा करीत होती. या दरम्यान निखिलला रिया आवडायला लागली. तो अन्य मुलांना सोडून देताना रियाला सर्वात शेवटी घरी सोडायचा. तिला नेहमी चालक सिटजवळील जागा देत होता. व्हॅन चालविताना तिच्याशी गप्पा करीत होता. त्याने रियाला हेरले आणि तीन महिन्यांतच तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती त्याच्या प्रेमात पडली. वर्षभरातच ती निखिलवर अतोनात प्रेम करायला लागली. अनेकदा निखिल रियाला शाळेत न सोडता चक्क फिरायला घेऊन जात होता. परंतु, कोरोनामुळे शाळा बंद पडल्या. दोघांचे बोलणे-भेटणे कमी झाले. त्यामुळे दोघांचाही जीव कासावीस होत होता. रियाच्या घरी कुणी नसल्यावर निखिल तिला भेटायला नेहमी येत होता. त्यामुळे दोघांच्या प्रेमाची कुणकूण होती.

घरात घुसला आणि आई आली -

बुधवारी सकाळी रियाची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. रियाकडून माहिती मिळताच निखिल घरी आला. दरवाजा बंद होताच शेजारनीने तिच्या आईला फोन केला. ती लगबगीने घरी आली आणि तिने दरवाजा उघडला. त्यावेळी दोघेही नको त्या अवस्थेत सापडले. आईने निखिलला झोडापायला सुरुवात केली तर रियाने निखिलची बाजू घेतली. शेवटी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

loading image
go to top