नागपुरात ‘माझ्या नवऱ्याची बायको’; पतीच्या दुसऱ्या बायकोला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न

mans first wife attacked on second wife by petrol
mans first wife attacked on second wife by petrol

नागपूर ः ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या टीव्ही मालिकेसारखा नागपुरात प्रकार उघडकीस येताच पहिल्या पत्नीने नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला जबरदस्त मारहाण केली. तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी लगेच धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. हा प्रकार शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास चक्क पोलिसांच्या भरोसा सेलच्या परिसरात घडला. सविता विनोद सव्वालाखे (३९, रा.शांतीनगर) असे पहिल्या पत्नीचे नाव आहे तर मोसमी शेखर झोडे (३२, कांजी हाऊस चौक) असे दुसऱ्या पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद सव्वालाखे हा भांडी घासायची पावडर बनविणाऱ्या कंपनीत नोकरीवर आहे. त्याचे सविता हिच्याशी १२ वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत. दोघांचाही सुखी संसार सुरळित सुरू होता. त्याच कंपनीत मौसमी हीसुद्धा नोकरीवर होती. तिला दोन मुले आहेत. विनोदच्या हाताखाली काम करीत असल्यामुळे दोघांचा चांगलीच ओळख झाली. 

दरम्यान मौसमीच्या पतीचे निधन झाले. एकाकी पडलेल्या विनोदने तिला बऱ्याचवेळी मदत केली. त्यामुळे दोघांची मैत्री वाढली. काही दिवसांतच त्या दोघांचे सूत जुळले. प्रेमसंबंध प्रस्थापीत झाल्यानंतर दोघांनाही एकमेकांचा सहवास मिळत होता. त्यामुळे विवाहित असलेल्या विनोदने विधवा असलेल्या मौसमी हिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिनेही विनोवर असलेल्या प्रेमापोटी लग्नास होकार दिला. 

पत्नीच्या लपून केले लग्न 

१९ मार्च २०२० रोजी विनोदने पत्नी सविताच्या लपून मौसमी सोबत लग्न केले. कधी न रात्री घराबाहेर न राहणारा पती गेल्या काही दिवसांपासून सतत बाहेर राहात असल्याने सविताला संशय आला. तिने त्याला जाब विचारला असता त्याने काम वाढल्याचे कारण सांगितले. पतीच्या वागण्यात फरक जाणवायला लागल्याने पत्नीने त्याचा एक दिवस पाठलाग केला. तेव्हा तो सायंकाळी थेट मौसमीच्या घरी जाताना दिसला. थेट तिने मौसमीसोबत त्याला रंगेहात पकडले. तेव्हा त्यांच्यात वाद वाढला. तिने नवऱ्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांनाही पोलीस ठाण्यात बोलावले आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

समूपदेशनासाठी भरोसा सेल

सविता आणि नवऱ्याची दुसरी बायको मौसमी यांचे प्रकरण भरोसा सेलमध्ये समूपदेशन करण्यासाठी पाठविले. गेल्या तीन तारखेला सविता, विनोद आणि मौसमी तारखेवर येत होत्या. सविताने थेट ‘माझा नवरा मला द्या’ अशी भूमिका घेतली. तर मौसमीनेसुद्धा लग्न केल्याचा दावा केला. विनोद मात्र दोघींकडे बघून काहीच बोलायला तयार नव्हता. पोलिसही पेचात सापडले. 

अशी घडली घटना

शनिवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास सविता, मौसमी आणि विनोद हे भरोसा सेलमध्ये समूपदेशनासाठी आले. मौसमीचे कॉन्सिलिंग झाल्यानंतर ती बाहेर येऊन बसली. तितक्यात हातात पेट्रोलने भरलेली बॉटल घेऊन सविता धावत आली आणि तिने मौसमीच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि माचिसही बाहेर काढून पेटविण्याचा प्रयत्न केला. मौसमीने आरडाओरडा करताच प्रसंगावधान राखत महिला पोलीस धावत आले. त्यांनी सविताला पकडले. तिच्या हातातील माचिस हिसकावून घेतली. त्यानंतर मौसमीच्या अंगावर पाणी ओतण्यात आले. 

 संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com