Maratha Reservation : मराठा समजाला ‘सरसकट’ कुणबी प्रमाणपत्र देण्यास अखिल भारतीय ओबीसी महासंघाचा विरोध

१७ सप्टेंबरला मोर्चा मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या
dr taywade
dr taywade sakal

नागपूर - मराठा समजाला ‘सरसकट’ कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याला अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या वतीनेही विरोध दर्शवण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या महासंघाच्या बैठकीत विरोधाचा ठराव करण्यात आला.

जालना येथे मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी संवर्गात समाविष्ट करावे अशी त्यांची मागणी आहे. यावर महासंघाने आपली भूमिका आज जाहीर केली.

dr taywade
Solapur News : जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये यंदा एक गाव एक गणपती

कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करू नये. बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. संपूर्ण देशात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करावी.

dr taywade
Nagpur News : बसमुळे कारवर कोसळली भिंत; चालकाला मारहाणीमुळे असंतोष

सर्वोच्च न्यायालयाने लादलेली ५०टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करावी. राज्यात ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यासाठी मंजूर केलेली ७२ वसतिगृहे त्वरित भाड्याच्या इमारतीत सुरू करावी. ओबीसी समाजातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांच्यासाठी स्वाधार योजना त्वरित लागू करावी.

नॉन क्रीमिलीयर प्रमाणपत्रातील आठ लाखांची मर्यादा काढून टाकावी. नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सरकारने त्वरित उपरोक्त मागण्या पूर्ण न केल्यास १७ सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाचा मोर्चा .

‘सरसकट’ला ओबीसी महासंघाचाही विरोध

काढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

dr taywade
Nagpur News : पोलिसांवर रोखले पिस्तूल, आरोपी फरार

आज झालेल्या सभेला डॉ. बबनराव तायवाडे, शरद वानखेडे, गुणेश्वर आरिकर, सुषमा भड, वृंदा ठाकरे, साधना बोरकर, नंदा देशमुख, रेखा बारहाते, अनिता ठेगरे, अनंता भारसाकळे, विक्रांत मानकर, परमेश्वर राऊत, अविनाश घागरे, प्रवीण डेहनकर, सुधाकर तायवाडे, रवींद्र राऊत, राम प्रसाद, शिवा भोयर, गजानन दांडेकर, गणेश हांडे, नीलेश तायवाडे, हरीश तळवेकर, पराग वानखेडे, शुभम वाघमारे, बाबा ढोबळे, विनोद हजारे, राजू चौधरी, ललित देशमुख, लीलाधर दाभे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com