

Nagpur Crime
sakal
नागपूर: मारी गँँग नावाने ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीने मंगलमूर्ती चौकातील उर्वशी बारमध्ये शिरून बारमालक व त्यांच्या मुलाला गंभीर जखमी केले होते. या टोळीतील १० आरोपींना पोलिसांनी घटनेच्या पाच दिवसांनंतर अटक केली आहे. अनिकेत ऊर्फ मारी राकेश शेंद्रे (वय २३, रा. संत तुकडोजीनगर, प्रतापनगर) असे अटकेत असलेल्या टोळीप्रमुखाचे नाव आहे.