esakal | Video : नागपूर ब्रेकिंग : शनिवारी, रविवारी बाजारपेठा तर शाळा, महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Markets are closed on Saturdays and Sundays while schools and colleges are closed till March 7

अशात पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी कडक नियमावली नागपूर जिल्ह्यासाठी जाहीर केली. याअंतर्गत शनिवारी व रविवारी बाजारपेठा बंद राहतील. २५ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत वेडिंग हॉल व लॉन बंद राहतील. रेस्टॉरंट्स व हॉटेल्स फक्त रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील.

Video : नागपूर ब्रेकिंग : शनिवारी, रविवारी बाजारपेठा तर शाळा, महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रोज तीन अंकात आकड्यात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली की काय, असा प्रश्न जनसामान्यासह प्रशासनाला पडला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत  यांनी नागपूर जिल्ह्यात व शहरात कठोर निर्णय सोमवारी जाहीर केले. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद राहतील. तसेच शनिवारी व रविवारी बाजारपेठा बंद राहतील. कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील काही दिवसांपासून विदर्भातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ होत असताना दिसत आहे. कोरोना रुग्णांसह मृतांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. म्हणूनच सुरुवातील अकोला व बुलढाणा येथे लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यानंतर रविवारी अमरावती जिल्ह्यातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तसेच वाढत्या रुग्णांमुळे यवतमाळ जिल्ह्याचीही वाटचाल ‘लॉकडाऊन’च्या दिशेने सुरू असल्याचे दिसत आहे.

अधिक वाचा - महापालिकेवर तुकाराम मुंढेचे वर्चस्व कायम! सत्ताधाऱ्यांमध्ये अद्यापही संताप, नव्या आयुक्तांकडून निर्णयाची अंमलबजावणी

नागपुरातील वाढती रुग्ण संख्या पाहता लॉकडाऊन होणार की काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. अशात रविवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील काही दिवसांत कोरोना नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले होते. सोबतच ‘नियम पाळा, लॉकडाऊन टाळा’ असे आवाहन केले होते.

अशात पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी कडक नियमावली नागपूर जिल्ह्यासाठी जाहीर केली. याअंतर्गत शनिवारी व रविवारी बाजारपेठा बंद राहतील. २५ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत वेडिंग हॉल व लॉन बंद राहतील. रेस्टॉरंट्स व हॉटेल्स फक्त रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील.

धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम बंद राहतील. हॉटेलमध्ये फक्त ५० टक्के ग्राहकांना परवानगी देण्यात आली आहे. रात्री ९ ते पहाटे ६ पर्यंत हॉटेल बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवा फक्त राहणार सुरू राहतील. लॉकडाऊन नसला तरी कठोर नियमावली कायम राहणार आहे.

जाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला

ठळक बाबी पुढीलप्रमाणे

  • कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ७ मार्चपर्यंत बंद राहतील
  • जिल्ह्यातील बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा - वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, औषध पेट्रोल पंप वगळून) बंद
  • आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार दिनांक ८ मार्चपर्यंत बंद
  • जिल्ह्यातील हॉटेल (रेस्टॉरंटस्) ५० टक्के क्षमतेने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
  • लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम दिनांक ७ मार्चपर्यंत बंद.
  • मंगलकार्यालय, लॉन्स, रिसॉर्ट २५ फेब्रुवारीपासून ८ मार्चपर्यंत बंद
  • कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार
  • कोरोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आएलटी तसेच सारीची तपासणी करणार
  • शहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रोकन्टोन्मेंट झोन तयार करून सक्तीने उपाययोजना. हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित.
  • मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई