नागपूर - राजस्थानमधील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवित, गंगाजमूना परिसरात वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी छापा टाकून २१ वर्षीय युवकाला लकडगंज पोलिसांनी अटक केली. तसेच दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.