Marriages Muhurta : शुभमंगल सावधान, २०२४ मध्ये ६६ विवाह मुहूर्त

नोव्हेंबरपासून लग्नाची धामधूम आठ मुहूर्त अधिक; इच्छुकांना दिलासा
nagpur news
nagpur news sakal

नागपूर - अधिक महिन्यामुळे दिवाळी लांबल्याने यंदा लग्न मुहूर्तही लांबले आहेत. मात्र, नोव्हेंबर महिन्यात तीन मुहूर्तांनी विवाह हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत ६६ मुहूर्त आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आठ मुहूर्त अधिक आहेत. यात ४४ गोरज मुहूर्तांचा योग आहे. मात्र वैशाखात लग्न करू इच्छिणाऱ्यांचा यंदा या महिन्यात एकही मुहूर्त नसल्याने हिरमोड झाला आहे.

दिवाळी आली की वधू- वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीला लागतात. तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्यांना सुरुवात होते. नोव्हेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात २७, २८, २९ या तारखांना विवाह मुहूर्त आहेत. डिसेंबरमध्ये ६, ८, १५, १७, २०, २१, २५, २६ आणि ३१, तर जानेवारी २०२४ मध्ये २, ६, ८, १७, २२, २७, २९, ३० आणि ३१ या तारखांना विवाहाची संधी आहे.

nagpur news
Nagpur News : लिव्ह-इन’मधील पप्‍पा द्यायचा चिमुकल्याला सिगारेटचे चटके

४४ गोरज मुहूर्त

काही लोकांना गोरज मुहूर्तावर लग्न करण्याची इच्छा असते. अशांसाठी नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ मध्ये एकूण ४४ गोरज मुहूर्त आले आहेत. त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. दिवाळीनंतर लग्नाची धामधूम सुरू होणार आहे.

nagpur news
Nagpur News : लिव्ह-इन’मधील पप्‍पा द्यायचा चिमुकल्याला सिगारेटचे चटके

वैशाखात शुभमंगल नाहीच

वैशाखात जास्त शुभ मुहूर्त असतात. त्यामुळे कडक उन्हात लग्नांची धूम असते. मात्र, यावर्षी ३ मे २०२४ ते २८ जून २०२४ पर्यंत लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. त्यामुळे ५६ दिवस मंगल कार्यालये, तसेच लग्नकार्याशी संबंधित व्यावसायिकांना घरी बसून राहण्याची वेळ येणार आहे.

नोव्हेंबर ते जुलै ६६ मुहूर्त

नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत लग्नाचे एकूण ६६ मुहूर्त आहे. मागील वर्षापेक्षा यंदा आठ मुहूर्त अधिक असून वधू- वराकडील मंडळींची लगबग सुरू झाली असून मंगल कार्यालयांचे बुकिंग सुरू झाले आहे.

nagpur news
PKL 2021 : U MUMBA नं 30 सेकंदात पलटलेला सामना अखेर बरोबरीत

साधारणपणे दसरा झाल्यानंतर वधू-वराकडील मंडळी लग्न कार्यासाठी कामाला लागतात. यावर्षी मात्र नोव्हेंबरच्या शेवटी लग्न मुहूर्ताला सुरुवात होत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक मुहूर्त आहे.

भूपेश गाडवे, पंचाग अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com