
नागपूर : नागपूर विभागीय शिक्षण विभागात बोगस कागदपत्रांच्या आधारे निवड आणि त्यानंतर शालार्थ आयडीच्या माध्यमातून हजारावर शिक्षकांचे पगार काढून शासनाची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी उपसंचालकासह, प्रभारी आणि दोन माजी उपसंचालकांना अटक केली. त्यामुळे विभागीय उपसंचालक आणि विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव हे दोन्ही पद रिक्त आहेत. मात्र, त्यांच्या जागेवर प्रभारी व नियमित नेमणुकीसाठी एकही अधिकारी तयार नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.