Nagpur Loksabha Constituency : हत्तीची ‘माया’ कोणावर? ; गुरुवारी बहनजींची सभा,उमेदवारांचे वाढले टेंशन

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील बसपाचे उमेदवार भाजप आणि काँग्रेसच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणार असल्याने दोन्ही पक्षांची नजर सध्या हत्तीच्या चालीवर आहे.
Nagpur Loksabha Constituency
Nagpur Loksabha Constituencysakal
Updated on: 

नागपूर : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील बसपाचे उमेदवार भाजप आणि काँग्रेसच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणार असल्याने दोन्ही पक्षांची नजर सध्या हत्तीच्या चालीवर आहे. यातच बसपाच्या बहनजी यांची सभा असल्याने त्यांची ‘माया’ आपल्यावर पडावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

बसपाने नागपूर लोकसभा मतदारसंघातून योगीराज लांजेवार तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांना उमेदवारी दिली आहे. दोघांपुढे रिपब्लिकन विविध पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी यांच्यापेक्षा जास्त मते घेण्याचे आव्हान आहे. अलीकडे पक्षाची कामगिरी रोडावत चालल्याने सर्वत्र चिंतेचा विषय आहे. सहसा खुल्या मतदारसंघातून अनुसूचित जातीचा उमेदवार दिला जात नव्हता.

याकरिता नागपूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी बसपाने अनेकांना ऑफर दिली होती. बसपाचा उदय झाला, तेव्हापासून पक्षाने आयात उमेदवारांवरच भर दिला होता. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. भाजपचे कोट्याधीश उमेदवार गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यासमोर बसपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या फारच कमकुवत आहे. त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या. एवढेच पाठबळ आणि ओळख लांजेवार यांची आहे. त्यात बसपाची सभा उत्तर नागपूरमध्ये होणार आहे.

रामटेकचे बसपाचे उमेदवार लाख ते दीड लाख मते घेण्याचा दावा करीत आहे. असे असले तरी आता त्यांनाही पैशाची चणचण भासू लागली आहे. भाजपसाठी हत्तीने चालणे तर काँग्रेसला हत्तीवर बसणे आवश्यक आहे. हे बघून पडद्याआड बऱ्याचा हालचाली सुरू असल्याचे समजते.

Nagpur Loksabha Constituency
Narendra Modi : आज नरेंद्र मोदी यांची कन्हानमध्ये सभा ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

मायावती यांची सभा बसपाच्या कार्यकर्त्यांसाठी सर्वोच्च असते. त्याकरिता मोठा खर्च असल्याने रामटेक आणि नागपूरच्या उमेदवाराची धावाधाव सुरू आहे. यात आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते आपले अस्तित्व व ताकद दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्याने उमेदवारांचे टेंशन वाढले आहे. हत्तीचे नाव सांगून पक्षातून बाहेर केलेले कार्यकर्तेसुद्धा अनेकांशी संपर्क साधत असल्याचे समजते.

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे दलित व मुस्लिमांची मते बसपाकडे वळतील असा कयास आहे. असे असले तरी मतदारांपर्यंत पोचण्यासाठी पुरेसे बळ आजघडीला पक्षाकडे दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Drought Review Meeting Cancelled Agriculture Minister Meetings In Pune And Nagpur Divisions Postponed
Nagpur Vacant Plots
Nagpur Longest Flyover
nagpur medical hospital
Marathi News Esakal
www.esakal.com