Nagpur News : द्विभाषिक नाही, कोरकू बांधवांच्या वेदना समजायच्या कशा?; मेडिकलमधील डॉक्टरांसमोर पेच, कंत्राट संपल्याने द्विभाषिकाची गेली नोकरी

Language Barrier at Hospital : देशाचा झपाट्याने विकास होत आहे. उपराजधानीही स्मार्ट होत आहे. मात्र, अजूनही मेळघाट, धारणी असो की, गडचिरोतील दुर्गम गावातील आदिवासींच्या आरोग्याचे चित्र भकास आहे. दुर्गम भागत वसलेल्या आदिवासी कोरकू बांधवांना उपचारासाठी भटकंती करावी लागते.
Korku patients face a communication barrier at the medical college after the bilingual interpreter’s job was terminated.
Korku patients face a communication barrier at the medical college after the bilingual interpreter’s job was terminated.esakal
Updated on

-केवल जीवनतारे

नागपूर: भाषिक अडचण दूर होऊन आदिवासी कोरकू बांधवांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी मेडिकलमध्ये द्विभाषिक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशकाची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्यात आली. कालावधी संपल्याने द्विभाषिकांची नोकरी गेली आणि पुन्हा भाषेची अडचण सुरू झाली असून कोरकू बांधवांवर उपचार करताना संभ्रमाची स्थिती निर्माण होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com