दिवाळीत रुग्णांसाठी व्हेज पुलावसह वेगळा मेनू; आहारात बदल

medical hospital in Nagpur
medical hospital in Nagpur medical hospital in Nagpur

नागपूर : मेडिकलमधील रुग्णांना दररोज भाजी-पोळी आणि वरण-भात हा आहार मिळतो. अविरत अन्नसेवा किंवा जेवणाची सुविधा मिळतेच. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी मिष्ठान्नासोबत सण साजरा होत असताना उपचाराधीन रुग्णांना साध्या आहारावरच समाधान मानावे लागते. यामुळे यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्हेज पुलाव, सेवया खीरसोबतच मिष्टान्नभोजन मिळणार आहे.

कोरोनामुळे अनेक जण बाधित होऊन रुग्णालयात दाखल झाले. रुग्णांना प्रोटिन्सयुक्त आहार मिळावा यासाठी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाच्या पुढाकाराने रुग्णांच्या आहारात अंडी देण्यात आली. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आहारात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. चपातीसह व्हेज पुलाव, कढी, आलू सोले भाजी, खीर तर मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी विशेष प्रकारचे भजे आहारात देण्याचा निर्णय मेडिकलचे अधिष्टाता डॉ. सुधीर गुप्ता आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी घेतला. व्हेज पुलावसह वेगळा मेनू जेवणात देऊन रुग्णांमध्ये आनंदी, सकारत्मक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे.

medical hospital in Nagpur
Video Viral : धोनीचे ‘ते’ वक्तव्य पाच वर्षांनंतर ठरले खरे

मेडिकलमध्ये ग्रामीण भागातील रूग्ण मोठ्या संख्येने उपचार घेतात. गरीब रुग्णांना मेडिकलमधील आहाराशिवाय पर्याय नसतो. काही रुग्णांचे घर दूर असल्याने त्यांनाही दिवाळीचा आनंद उपभोगता यावा हेतू असल्याचे प्रशासनाने सांगितले. एक हजार ते बाराशे रुग्ण मेडिकलमध्ये दाखल असतात. दिवाळीच्या दहा दिवसांसाठी हा मेन्यू असावा असा सूर कर्मचाऱ्यांमध्ये उमटला आहे.

रुग्णांना नियमित आहार मिळतो. मात्र दिवाळी सण आनंदाचा आहे. रुग्णांना तो साजरा करता यावा. जेवणाची सोय करताना काहीसा बदल करण्याचा निर्णय घेतला. रुग्णांसह नातेवाईक समाधानी व्हावे हा यामागचा हेतू आहे.
- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल
दिवाळीला मेडिकलमध्ये रुग्ण भरती असतात. रुग्णांच्या सेवेत डॉक्टर, परिचारिका असतात. त्यांचीही दिवाळी रुग्णसेवेतच असते. अशावेळी रुग्णांना गोडधोड पदार्थ खाऊ घातल्यास त्यांच्या मनावर सकारारत्मक परिणाम होतो. रुग्णांची रुग्णालयात दिवाळी साजरी करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com