esakal | दुचाकी वेगात चालविण्यावरून झाला वाद आणि घडला मन हेलावून टाकणारा हत्याकांड

बोलून बातमी शोधा

दुचाकी वेगात चालविण्यावरून झाला वाद आणि घडला मन हेलावून टाकणारा हत्याकांड
दुचाकी वेगात चालविण्यावरून झाला वाद आणि घडला मन हेलावून टाकणारा हत्याकांड
sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : वेगात दुचाकी चालविण्यावरून झालेल्या वादात रूपेश कुंभारे (रा. मराठा चौक, बांग्लादेश) या युवकाचा पाच ते सहा आरोपींनी तलवार-गुप्तीने भोसकून खून केला. हे हत्याकांड मंगळवारी रात्री १०च्या सुमारास घडले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. प्रवीण ऊर्फ गोलू वाघमारे (वय २५), गौरव गिरडे (वय २६) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा: नागरिकांनो सावधान! तुमच्या खिशातील नोटा डुप्लिकेट तर नाहीत ना? शंभर, दोनशेंच्या नोटांमध्ये गडबड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कुंभारे हा सलूनच्या दुकानात काम करतो. तो मंगळवारी सायंकाळी दुचाकीने वेगात जात होता. त्यामुळे आरोपी गोलू आणि गौरवने त्याला हटकले. रवींद्रने त्यांच्याशी वाद घातला. दोघांनीही एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली आणि निघून गेले.

हेही वाचा: दुर्दैवी! एकाच आठवड्यात बाप-लेकानं गमावला जीव;आई अजूनही रुग्णालयात

रवींद्र घरी गेला आणि जेवण करून दुचाकीने परत वस्तीत आला. तो गोलू आणि गौरव या दोघांना दिसला. आता रवींद्र आपला गेम करणार, अशी भीती दोघांनाही वाटली. त्यामुळे त्यांनी तीन मित्रांना गुप्ती-तलवार घेऊन बोलावले. रवींद्र परत जात असतानाच त्याला अडविले. त्याच्यावर वार केले व पळ काढला. पाचपावली पोलिसांनी रवींद्रचे वडील मुरलीधर कुंभारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

संपादन - अथर्व महांकाळ