esakal | सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; प्रात्यक्षिकासाठी शाळेत बोलवण्याचे पुणे रिजनचे आदेश

बोलून बातमी शोधा

सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; प्रात्यक्षिकासाठी शाळेत बोलवण्याचे पुणे रिजनचे आदेश
सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; प्रात्यक्षिकासाठी शाळेत बोलवण्याचे पुणे रिजनचे आदेश
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्रीय शिक्षण मंडळाद्वारे देशात कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलली आहे. असे असताना पुणे विभागाने आदेश काढून विभागात येणाऱ्या सर्व राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्षरित्या उपस्थित राहून परीक्षा घेत, गुण अपलोड करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे कसे असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित होत आहे. दुसरीकडे विभागाच्या आदेशामुळे शाळा विद्यार्थ्यांना सक्ती करीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या खर्चातून कोरोना बाधितांसाठी व्हेंटिलेटर; नागपुरातील अजित पारसे यांचं कौतुकास्पद पाऊल

राज्यासह देशात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातुन सीबीएसईनेही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्र सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. याशिवाय बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे आंतरिक गुण आणि प्रात्यक्षिकांचे गुण बोर्डाकडे पाठवायचे आहेत. मात्र, बारावीचे ५० टक्के प्रात्यक्षिक परीक्षा व्हायच्या आहेत. त्यामुळे या परीक्षांचे गुण अद्याप विभागाला शाळांनी पाठविले नाही. त्यातूनच पुणे विभागाने विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशामुळे जवाहर नवोदय विद्यालय आणि सर्व सीबीएसई शाळांनी विद्यार्थ्यांना बोलावून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे फर्मान काढले आहे. सीबीएसईच्या पुणे विभागात गुजरात, महाराष्ट्र दीव-दमन यामधील शाळांचा समावेश आहे. मात्र, महाराष्ट्रात कोरोनामुळे जवळपास सर्वच जिल्ह्यात टाळेबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायचा कशा आणि मुलांना शाळेत पाठवायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना बोलावण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण: अपर पोलिस महासंचालकांनी घेतला आढावा; पतीसह आईचेही बयाण नोंदवले

नागपुरात परिस्थिती गंभीर

राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे सीबीएसई शाळेच्या प्राचार्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत एक प्राचार्यांना विचारणा केली असता, त्यांनी प्रात्यक्षिक घेणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले.

संपादन - अथर्व महांकाळ