

Vice Chancellor Manali Kshirsagar addressing officials and staff during a university meeting.
Sakal
नागपूर : विद्यापीठात मोठे राजकारण होते, विशिष्ट गटांची सरशी आहे, असे मी ऐकून होते. मात्र मला त्याचे काही करायचे नाही. कुठल्याही राजकारणाला मी घाबरत नाही किंवा त्याचा प्रभावही माझ्यावर पडत नाही. माझ्यासाठी विद्यापीठाचे व विद्यार्थ्यांचे हित सर्वोपरी आहे, अशी ठाम व विद्यार्थीकेंद्रित भूमिका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी व्यक्त केली.