esakal | 'नागपुरातील वेश्यावस्तीबाबत पोलिसांच्या निर्णयाचे स्वागत, पण...'
sakal

बोलून बातमी शोधा

Yashomati Thakur

'नागपुरातील वेश्यावस्तीबाबत पोलिसांच्या निर्णयाचे स्वागत, पण...'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : नागपुरातील २०० वर्षे जुनी वेश्यावस्ती असलेला गंगाजमुना (red light area nagpur) परिसर पोलिसांनी सील केला. त्यामुळे अनेक वारांगनावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबाबत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati thakur) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोलिसांच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, कारवाई करण्यापूर्वी एकदा बालकल्याण विभागाच्या आयुक्तांसोबत बसून निर्णय घ्यायला पाहिजे होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: 'देहव्यापार बंद केला तर सरकार नोकरी देईल का?' गंगा जमुनामध्ये आंदोलन

नागपुरात गेल्या २०० वर्षांपासून वेश्यावस्ती सुरू आहे. यालाच गंगा जमुना देखील म्हणतात. मात्र, गेल्या १२ ऑगस्टला पोलिसांनी हा परिसर सील केला. या वस्तीत अवैध धंदे आणि कोरोना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार वस्तीशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या परिसरात अवैध धंद्यांना उधाण आले असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. त्यानंतर या परिसरातील महिला आक्रमक झाल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीच्या ज्वाला धोटे यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला होता. त्यांनी दोन ते तीन वेळा आंदोलन करून वस्तीतील बॅरिकेटींग तोडले होते. मात्र, त्यानंतरही वस्तीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

'वेश्यावस्तीतील महिलांचं पुनर्वसन होणं गरजेचं'

वेश्यावस्तीबाबत बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, अल्पवयीन मुलींचा देहव्यापारासाठी वापर होत असल्यानं पोलिसांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मात्र, त्या महिलांचं पुनर्वसन करायला हवं आणि अशी कारवाई करण्यापूर्वी महिला आणि बालकल्याण विभागाचे आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा होता. त्याचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

loading image
go to top