थरार! आईला व बहिणीला होणाऱ्या त्रासाला कंटाळून १६ वर्षीय मुलाने केला दारुड्या बापाचा खून

A minor boy killed his drunken father Nagpur crime news
A minor boy killed his drunken father Nagpur crime news

कुही (जि. नागपूर) :  वडिलांच्या रोजच्या कटकटीला कंटाळून राग अनावर झाल्याने विधिसंघर्ष ग्रस्त बालकाने दारुड्या बापाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. ही घटना चापेगडी, ता. कुही येथे मंगळवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली.

 कुही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव राजकुमार रघुनाथ गेडाम (४५, रा. चापेगडी) असे आहे. मृत हा शेतमजुरीचे काम करायचा. त्याला पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. तो दररोज दारू पिऊन घरी यायचा. दारूच्या नशेतच आपल्या पत्नीला व मुलीला अश्लील शिवीगाळ करून भांडण करायचा.

आईला व बहिणीला होणाऱ्या त्रासाला कंटाळून व मनात राग धरून तो अनावर झाल्याने १६ वर्षीय मुलाने वडील दारूच्या नशेत असताना व शिवीगाळ करीत असल्याने कुऱ्हाडीने डोक्यावर मारून ठार केले. घटनेची माहिती मिळताच कुही पोलिस घटनास्थळी पोहोचून कसून झडती घेतली. मृताची पत्नी, मुलगी व मुलगा यांना घटनेसबंधी विचारपूस केली असता मुलाने पोलिसांना पाहूनच घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती देऊन गुन्हा कबूल केला.

सदरची घटना ही मुलाच्या आई व बहिणीने पाहिली आहे. त्यांनी सुद्धा आपल्या मुलाने त्याचे वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने मारून ठार केल्याचे कबूल केले आहे. सदर घटनेबाबत कुही पोलिसांनी मृताच्या मुलाविरुद्ध (विधिसंघर्षग्रस्त बालक) कलम ३०२ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. नि. चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात सपोनि. कमलेश सोनटक्के, शिपाई गिरीधर राठोड करीत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com