esakal | अल्पवयीन मुलांना 'पॉर्न'चे आकर्षण! ऑनलाइन क्लासेसमध्ये नोटिफिकेशनमुळे लक्ष विचलीत
sakal

बोलून बातमी शोधा

online

अल्पवयीन मुलांना 'पॉर्न'चे आकर्षण! 'असे' होते लक्ष विचलीत

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : ऑनलाइन क्लासेससाठी (online class) पालकांनी मुलांना टॅब आणि स्‍मार्टफोन दिले. मात्र, क्लासेसमुळे अल्पवयीन मुला-मुलींचा `पॉर्न’कडे कल (offensive content) वाढत आहे. यासोबतच मोबाईलवर वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे सुद्धा मुलांचे अश्‍लीलतेकडे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे आता नवीनच सामाजिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. (minor children attract towards offensive content)

हेही वाचा: ...अन् त्याने व्हिडिओ कॉलवरून मामाला दाखवला आईचा मृतदेह

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे ऑनलाइन क्लासेसला मंजुरी मिळाली. त्यामुळे जवळपास प्रत्येक पालकांनी मुला-मुलींना इंटरनेटच्या सुविधेसह स्मार्टफोन दिले. ऑनलाइन क्लासेस संपल्यानंतरही स्मार्टफोन मुलांकडे राहतो. स्मार्टफोन वापरतानाच मुलांमध्ये सोशल मीडियाचे आकर्षण वाढले असून फेसबुक, इंस्टाग्राम. यु-ट्यूब आणि ट्विटरची क्रेज आहे. मुलींमध्ये तर इंस्टाग्रामचे एवढे फॅड आहे की, दोन-दोन अकाऊंटवर ॲक्टिव्ह असतात. इंस्टावर व्हिडिओ बनवून पोस्ट करायचे भारी फॅड विशेष करून मुलींमध्ये दिसून येते. यासोबतच फेसबुक, इंस्टावर अश्‍लील वेबसाईटच्या लिंक येत असतात. अनेक विद्यार्थी उत्सुकतेपोटी लिंक उघडून पाहतात. यामुळे मुलांना अश्‍लील वेबसाइटवर सर्फिंग करायचे व्यसन लागते. घरात कुणी नसले की मुले- मुली अश्‍लील फोटो किंवा व्हिडिओ असलेल्या साईट्सला भेटी देत असल्याची बाब समोर आली आहे.

सोशल मीडियाचा चस्का -

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची अनेकांना सवय असते. सुंदर फोटो काढून फेसबूक किंवा इंस्टावर अपलोड करताच येणारा लाईक्स आणि कमेंटचा पाऊस बघून सोशल मीडियाचा मुला-मुलींना चस्का लागतो. यातूनच अश्‍लील व्हिडिओ आणि वेबसाईट बघण्याची सवय लागते.

मुलांमध्ये वाढेल हिंसक वृत्ती -

अश्‍लील वेबसाइटवर फोटो-व्हिडिओ बघितल्यास बालमनावर विपरित परिणाम होतात. मुला-मुलींमध्ये भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होते. प्रेमाबाबत कल्पना नसतानाही मुलांना उत्सुकता निर्माण होते. यातूनच मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मुलांनी लहान वयात पॉर्न पाहू नये यासाठी पालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. गुगल क्रोमवरून सहसा अशा वेबसाइट पहिल्या जातात. त्यामुळे त्यावर ‘सेफ सर्च ॲक्टिवेट’ करून मुलांच्या हाती फोन द्यावा. मुले काय पाहतात, यासाठी सर्च इंजिनची हिस्ट्री तपासावी. या बाबतीत मुलांची प्रेमाने समजूत घालावी.
- केशव वाघ, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम
मुलांचे मन अबोल असते. पालकांना लैंगिक विषयावर मुलांनी प्रश्‍न विचारले तर त्याचे योग्य समाधान करावे. मुले जिज्ञासेपोटी लैंगिकतेकडे वळतात. काय करावे आणि काय करू नये, याची त्यांना समज नसते. पालकांनी तारतम्य बाळगून मुलांची समजूत घालावी. सहज आणि समजेल अशा भाषेत मुलांचे प्रबोधन करावे.
-प्रा. राजा आकाश, मानसोपचारतज्ज्ञ
loading image