
सहमतीने प्रेमसंबंध असल्याचे दाखविण्यासाठी काढला मोबाईल अन् प्रेयसीने केला अत्याचाराचा आरोप
नागपूर : दोघेही १६ आणि १७ वर्षांचे. एकाच शाळेत शिकणारे. तीन वर्षांपासून जोमात प्रेमसंबंध सुरू होते. पण, कोरोनाने (corona) घोळ घातला आणि शाळाच बंद झाली. प्रेमीजीवांना भेटण्याची अडचण निर्माण झाली. मात्र, परिस्थितीशी सामना करीत त्यांनी प्रेमलीला सुरूच ठेवल्या. एक दिवस प्रेयसीच्या आईने दोघांनाही रंगेहात पकडले आणि प्रेयसीला बळजबरी पोलिस ठाण्यात आणून तक्रार (Report to police station) दिली. पोलिसांनी मुलाच्या मोबाईलमध्ये (Mobile) असलेला दुसऱ्या मुलीचा फोटो दाखविताच प्रेयसीने प्रियकरावर अत्याचाराचा आरोप लावला. (Minor girlfriend accused of abusing minor boyfriend)
प्राप्त माहितीनुसार, एमआयडीसी हद्दीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे तिच्याच शाळेत असलेल्या १७ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचेही सुरळीत सुरू होते. पण, कोरोना सुरू झाला आणि शाळाच बंद झाली. प्रेमीजीवांना विरह सहन होत नसल्याने ते कसेही करून एकमेकांना भेटायचे. मुलगा आणि मुलगी दोन्ही हातमजुरी करणाऱ्या कुटुंबातील आहेत.
हेही वाचा: याला म्हणतात माणुसकी! कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास उपचाराची रक्कम परत
मुले शिकतील, त्यांचे आयुष्य चांगले बनवतील या विचाराने आई-वडील कष्ट करीत होते. मात्र, मुलगा आणि मुलगी दोघांनाही याची जाणीव नव्हती. एमआयडीसी हद्दीतील सूतगिरणी परिसरात ते भेटायचे. रविवारी पुन्हा मुलाने मुलीला सूतगिरणी परिसरात बोलविले. मात्र, मुलीने वडील घरीच असल्याचे सांगून त्या दिवशी येण्यास नकार दिला.
मुलगी त्याला भेटण्यासाठी सोमवारी घराबाहेर पडली. मुलगी काही न सांगता घराबाहेर पडल्याचे पाहून मुलीची आईही तिच्या मागे-मागे गेली. मुलीच्या माघारी असलेल्या आईने मुलाला आणि मुलीला रंगेहात पकडले. तेथून ती मुलीला सरळ हिंगणा पोलिस ठाण्यात घेऊन आली. तेथे मुलीच्या आईने मुलाविरुद्ध अत्याचाराची तक्रार नोंदवायची आहे, असे सांगितले.
हेही वाचा: VIDEO : चंद्रावर दफन केलेली एकमेव व्यक्ती माहिती आहे का?
तेव्हा मुलाने प्रेमाची कबुली दिली. तसेच सहमतीने संबंध असल्याचे दाखविण्यासाठी त्याचा मोबाईल पोलिसांना दाखविला. त्यात मुलीने त्याला पाठविलेले अनेक ‘न्यूड’ फोटो होते. दरम्यान, मोबाईलमध्ये दुसऱ्या एका मुलीचाही फोटो होता. हे पाहून चिडलेल्या मुलीने त्याच्यावर अत्याचाराचे आरोप लावले. पोलिसांनी मुलाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
(Minor girlfriend accused of abusing minor boyfriend)
Web Title: Minor Girlfriend Accused Of Abusing Minor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..