esakal | दुर्दैवी! लहानग्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात बहिणही बुडाली
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्दैवी! लहानग्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात बहीणही बुडाली

दुर्दैवी! लहानग्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात बहीणही बुडाली

sakal_logo
By
अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि. नागपूर) : आरूषी आणि अभिषेक ही भावंड रविवारी गावातून दिसेनाशी झाली. आई-वडील मजुरीला गेले होते. शाळा नसल्याने दोघेही घराशेजारी खेळत असत. आई सायंकाळी शेतातून घरी आली असता दोघेही दिसले नाही. असतील इथेच कुठे तरी म्हणून थोडावेळ वाट बधितली. रात्रीचे आठ वाजायला आले तरी दोघेही दिसत नसल्याने माउलीच्या मनाचा धीर सुटला. गावात सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ती सापडली नाही. सोमवारी सकाळी दोघांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी मिळाली अन् वाट बघत असलेल्या आईने एकच हंबरडा फोडला. (Missing-small-child-died-in-Nagpur-rural)

हिंगणा तालुक्यातील देवळी सावंगी येथे नामदेव राऊत कुटुंब दोन मुलाबाळांसह वास्तव्याला होते. आरूषी पाचव्या वर्गात तर अभिषेक हा तिसऱ्या वर्गात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, देवळी सावंगी येथे शिक्षण घेत होते. शेतमजुरी करून कुटुंबाचा गाडा रेटत असताना १३ जून रोजी दुपारी आरूषी (१०) व अभिषेक (८) हे भाऊ-बहीण घरून बेपत्ता झाले. राऊत कुटुंबीय शेतातून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सर्वत्र शोधाशोध केली असता दोघेही आढळून आले नाही. शेवटी पालकांनी हिंगणा पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली.

हेही वाचा: ...म्हणून महाविकासआघाडीतून बाहेर पडा आणि महायुतीचे सरकार स्थापन करा

पोलिस मुलांचा शोध घेत असताना सोमवारी (ता. १४) देवळी-सावंगी शिवारालगत असलेल्या नाल्याजवळ दोन लहान मुलांचे कपडे आढळून आले. याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. ठाणेदार सारीन दुर्गे व पोलिस उपनिरीक्षक नरवाडे हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जि. प. महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोढारे यांनी जेसीबी पाठवून बचाव कार्यात मदत केली.

यानंतर देवळी सावंगी पट्टीचे पोहणारे नामदेव गोमासे, मोहन पारसे, मंगेश चांदेकर, बालू करपाते गंगाधर नगरे यांनी नाल्यातून दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. शेतमजूर असलेल्या राऊत कुटुंबातील दोन्ही अपत्य हिरावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हेही वाचा: सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेने घातला १९ लाखांनी गंडा

मुले नाल्यावर कसे आले?

बेपत्ता दोन्ही मुलांचा रात्री दोन वाजेपर्यंत गावातील लोकांनी शोध घेतला. परंतु, सकाळ आठच्या सुमारास घराशेजारील नाल्याच्या काठावर त्यांचे कपडे दिसले. यामुळे आई-बापाचे काळीजच फाटले. काही वेळांनी आरूषी आणि अभिषेक यांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजले. लहानग्या भाऊ बुडत असल्याचे पाहून वाचविण्याच्या प्रयत्नात बहिणही बुडाली. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. हे दोन मुले नेमके नाल्यावर कसे आले? याचा शोध पोलिस घेत आहेत.

(Missing-small-child-died-in-Nagpur-rural)

loading image