esakal | चंद्रपुरात 'बल्क ड्रग्सपार्क' सुरू करा, आमदार वंजांरींची आरोग्यमंत्र्यांना मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

mla abhijeet wanjari demand to starts bulk drugs spark in chandrapur

केंद्र शासनाच्या पुढाकाराने सध्या आपल्या देशात औषधांसाठी लागणाऱ्या कच्चामालाची चीन या देशावर असलेली निर्भरता कमी करण्यासाठी आपल्या देशामध्ये तीन राज्यात औषधीला लागणाऱ्या कच्चामालाचे 'बल्क ड्रग्सपार्क' (अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट ) सुरू करण्यासाठी सर्व राज्यातून आवेदन मागविण्यात आले.

चंद्रपुरात 'बल्क ड्रग्सपार्क' सुरू करा, आमदार वंजांरींची आरोग्यमंत्र्यांना मागणी

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : केंद्र सरकारद्वारे सर्व राज्यांकडून 'बल्क ड्रग्स पार्क'साठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्र राज्यातील औषधी वनस्पतीची उपलब्धता लक्षात घेता सकारात्मक विचार केला जात आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आयुर्वेद व अॅलोपॅथीला लागणाऱ्या औषधाच्या कच्चामालाच्या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्याला हा प्रकल्प मिळाल्यास चंद्रपूर जिल्ह्यात 'बल्क ड्रग्सपार्क' उभारण्यात यावा अशी मागणी आमदार अ‌ॅड. अभिजित वंजारी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली आहे. 

हेही वाचा - Well Treat Hospital Fire : आगीत चार रुग्णांचा होरपळून मृत्यू, मृतांची संख्या...

केंद्र शासनाच्या पुढाकाराने सध्या आपल्या देशात औषधांसाठी लागणाऱ्या कच्चामालाची चीन या देशावर असलेली निर्भरता कमी करण्यासाठी आपल्या देशामध्ये तीन राज्यात औषधीला लागणाऱ्या कच्चामालाचे 'बल्क ड्रग्सपार्क' (अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट ) सुरू करण्यासाठी सर्व राज्यातून आवेदन मागविण्यात आले. त्यात पंजाब, हिमाचल प्रदेश सोबत महाराष्ट्र राज्यातील औषधी वनस्पतीची उपलब्धता लक्षात घेता सकारात्मक विचार केला जात आहे. राज्याच्या रसायन व उर्वरक मंत्रालयाने याबाबतीत अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून १ हजार कोटी तर राज्य शासनाकडून चारशे कोटीचा निधी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एका ड्रग्स पार्कमध्ये किमान ८० औषधे बनविणाऱ्या कंपन्यांना प्रकल्प उभारण्यासाठी मंजुरी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. तेव्हा 'बल्क ड्रग्सपार्क' प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात यावा अशी मागणी आमदार अॅड. अभिजित वंजारी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे निवेदन देत केली. यावर राजेश टोपे यांनी आरोग्य सचिवांना तातडीने या प्रकल्पाची तपासणी करण्यासाठी आदेश दिले. 

हेही वाचा - Weekend Lockdown: राज्यात दोन दिवस कडक लॉकडाउन; वर्षभरापूर्वीच्या भीषण स्थितीचा येणार...

वनऔषध परिसराचा फायदा - 
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनक्षेत्राखाली जमीन आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये आयुर्वेद व अॅलोपॅथीला लागणाऱ्या औषधाच्या कच्चामालाच्या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. प्रकल्प चंद्रपूर येथे उभारल्यास त्या जिल्ह्यातील वनस्पती औषधांचा फायदा मोठ्या प्रमाणात कच्चामालासाठी होणार आहे. सोबतच औषध क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संशोधन प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे. तसेच सातत्याने विदर्भाचा अनुशेषाचा निर्माण होणारा प्रश्न काही प्रमाणात दूर होणार आहे. याशिवाय यामाध्यमातून विदर्भातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचे आमदार अ‌ॅड. अभिजित वंजारी यांनी सांगितले.