
नागपूर : संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्याकरिता 'रक्षा कॉरिडॉर' (डीएनए) देशामध्ये तयार केले जात आहे. नागपूर जिल्ह्यामधील सावनेर येथे डीएनए (डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस) या क्षेत्रात काम करणाऱ्या 'रक्षा कॉरिडॉर' (डीएनए) सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी डॉ. आशिष देशमुख यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना पत्राद्वारे केली आहे.