esakal | अखेर आमदार सावकर प्रगटले अन् थेट गाठले पोलिस ठाणे
sakal

बोलून बातमी शोधा

mla sawarkar

अखेर आमदार सावकर प्रगटले अन् थेट गाठले पोलिस ठाणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरू असताना कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे ते हरवले असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत होत्या. त्यातच एकाने त्यांना श्रद्धांजलीसुद्दा अर्पण केली. त्यामुळे चिडलेल्या आमदाराने थेट वाठोडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

हेही वाचा: ऑनलाइन प्रेमातून मुलीला मारण्याचा प्रयत्न

ग्रामीण भागातही झपाट्‍याने करोनाचे संक्रमण वाढले आहे. मात्र, लोकप्रतिनिधी दिसत नसल्याच्या तक्रारी आहे. बेड्‍स, ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हिर मिळत नसल्याने जनता हतबल झाली आहे. अशा परिस्थितीत कामठीचे आमदार काहीच मतद करीत नाही. ते दिसत नाही आणि तक्रारीची दखलही घेतली नसल्याच्या तक्रारी आहे. त्यामुळे एका संतप्त नागरिकाने आमदार टेकचंद सावरकर हरवले असल्याची पोस्ट टाकली. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना चांगलीच संधी मिळाली. ही पोस्ट संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाल्याने चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. यात एकाने व्हाअ‌ॅपवर चक्क आमदाराला श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे आमदार चांगलेच संतापले. प्रीतम व त्याच्या दोन साथीदाराच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत विचारणा केली असताना सावकर यांनी पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजप विरोधकांचा हा डाव असल्याचे सांगितले.

loading image