Sunil Kedar : सुनील केदारांची रवानगी कारागृहात; डॉक्टरांकडून ‘फिट’चा अहवाल

गेल्या २२ डिसेंबरपासून त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
mla sunil kedar sent to jail doctor report bank scam accused police nagpur
mla sunil kedar sent to jail doctor report bank scam accused police nagpursakal

Nagpur News : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या घोटाळ्यात आरोपी असलेले माजी आमदार सुनील केदार यांना बुधवारी (ता.२८) रात्री मेडिकलमधील अतिदक्षता विभागातील चार तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रकृती बरी असल्याचा अहवाल सादर केला.

हा अहवाल येताच, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत, त्यांची तडकाफडकी कारागृहात रवानगी केली. गेल्या २२ डिसेंबरपासून त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या घोटाळ्याच्या निकाल २२ डिसेंबरला देण्यात आला. निकालात पाच वर्षाची शिक्षा माजी आमदार सुनील केदार यांना ठोठावण्यात आली. याच दिवशी छातीत दुखत असल्याने त्यांना मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान त्यांना मायग्रेनचा त्रास, निमोनियाचे लक्षण आढळून आले होते. ताप वाढल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. याशिवाय किडनीचाही संसर्ग झाल्याने उपचाराचा कालावधी वाढला. मात्र, डॉक्टरांनी प्रकृती स्थिरावताच, ते ‘फिट’ असल्याचा अहवाल दिला.

त्यानंतर तडकाफडकी पोलिसांनी मेडिकलमध्ये पाचारण करीत, त्यांची कारागृहात रवानगी केली. यावेळी मेडिकलमध्ये खुद्द पोलिस उपायुक्तांसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

mla sunil kedar sent to jail doctor report bank scam accused police nagpur
Congress Nagpur Rally: भाजप खासदाराने सांगितली 'अंदर की बात'! राहुल गांधींनी सांगितला लोकसभेतील किस्सा

अर्ध्या तासापूर्वी दिली ‘डिस्चार्ज’ची माहिती

मेडिकलमधील पथकाने माजी आमदार सुनील केदार यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल सादर केला. त्यामुळे त्यांची कारागृहात रवानगी करण्यासाठी केवळ अर्ध्या तासापूर्वी डिस्चार्ज करण्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांना काही वेळ तयारीसाठी देण्यात आला. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

‘आफ्टर बॅरेक’मध्ये मुक्काम

मेडिकलमधून पोलिस ताफ्यात कारागृहात रवानगी केल्यावर माजी आमदार सुनील केदार यांना कारागृहातील ‘आफ्टर बॅरेक’मध्ये इतर कैद्यासोबत ठेवण्यात येणार आहे. पोलिस कस्टडीमधून आणल्यावर सर्वच कैद्यांना ‘आफ्टर बॅरेक’मध्ये ठेवण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com