Nagpur Crime News : पैशाचा वाद जिवावर बेतला; डोक्यावर बॉटल फोडून चोरट्याचा खून

पैशाच्या वादातून दारूच्या नशेत एका चोरट्याने दुसऱ्याच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडून ठार केले.
money dispute alcoholic person killed one police nagpur
money dispute alcoholic person killed one police nagpurSakal

नागपूर : पैशाच्या वादातून दारूच्या नशेत एका चोरट्याने दुसऱ्याच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडून ठार केले. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगर गार्डनमध्ये शनिवारी (ता.२०) पहाटे पावणेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली.

चंदनसिंग प्रमोद बंशकार (वय २६, रा. सुर्यनगर) असे मृताचे नाव असून संतोष उर्फ भाचा जितलाल पटीला (वय २०, रा. मिनीमाता नगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चंदनसिंग आणि संतोष हे दोघेही मजुरीचे काम करायचे. मात्र, त्यांच्यावर चोरीचे गुन्हेही दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास दोघेही सूर्यनगर येथील गार्डनमध्ये विकलांग पार्किंगच्या समोर फुटपाथवर बसले होते. दरम्यान त्यांच्यात चोरीच्या पैशावरून वाद निर्माण झाला. दोघेही एकमेकांना शिवीगाळ आणि हाणामारी करू लागले. रागाच्या भारात संतोषने त्याच्या डोक्यावर दारूची बाटली मारली.

त्यामुळे चंदनसिंग जखमी झाल्याने संतोष पळून गेला. नातेवाईकांनी त्याला मेयो हॉस्पिटल येथे दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा पहाटे पावणेसहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत संतोषला अटक केली. संतोषवर तीन ते चार गुन्हे दाखल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com