Video : हा आजार बरा होणारा, तसे विचार टाळण्यासाठी 'कोरोना'च्या बातम्या बघणे बंद करा...

More fear of Corona from social media
More fear of Corona from social media

नागपूर : शंभरपैकी 95 रुग्ण बरे होत आहेत, याकडे "कोरोना' बाधितांचे लक्ष जात नाही. "टीव्ही' आणि "सोशल मीडिया'वरूनही "कोरोना' विषयी सातत्याने "पॅनिक अटॅक' होताना दिसत आहे. यामुळेच एखाद्याच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ शकतात. हे टाळायचे, तर "कोरोना'च्या बातम्या बघणे बंद करा, असा सल्ला ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ राजा आकाश यांनी दिला. 

अकोला आणि नाशिक येथे "कोरोना'बाधितांनी आत्महत्या केली. हे असे का घडले, याबाबत राजा आकाश यांच्याकडून माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, "कोरोना' सर्वत्र पसरल्यामुळे लोकांमध्ये आधीच दहशत निर्माण झाली असताना "सोशल मीडिया'वरील असंख्य "पोस्ट्‌स'मुळे यात आणखीच भर पडत आहे.

त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात एक भयावह चित्र निर्माण होत आहे. "माझा मृत्यू झाला, तर माझ्या कुटुंबाचे काय होईल,' अशा असंख्य विचारांचे काहूर मनात माजू शकते. त्यामुळे लोकांमध्ये निराशा बळावू शकते. त्यातूनच आत्महत्येसारखी पळवाट शोधण्याचा प्रयत्न होतो. 

टीव्ही आणि सोशल मीडियावरून "कोरोना'च्या आकडेवारीचा "क्रिकेटच्या स्कोअर'प्रमाणे खेळ मांडला जात आहे. परिणामी अनेकांच्या मनात "कोरोना'बाबतच विचार सुरू असतो. म्हणून मग साधा सर्दी, खोकला असला तरीही "डॉक्‍टरां'च्या सल्ल्यासाठी रांगा लागत आहेत. एकूणच काय तर "कोरोना फोबिया'च दिसतो आहे. याबद्दल समुपदेशनही सुरू आहे. परंतु, "सोशल मीडिया'वर नकारात्मक बाजूच जास्त मांडली जात आहे. 

परीक्षेत गुण कमी पडल्यानंतर आपल्या कुटुंबाची होणारी मानहानी, प्रेमात नकार मिळाल्यामळे येणारी निराशा, असेच काहीसे नकारात्मक विचाराचे काळेकुट्ट ढग मनात निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आता मानसोपचारतज्ज्ञांचीही जबाबदारी वाढली आहे. समाजाचे समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही राजा आकाश म्हणाले. 

'सोशल मीडिया'वर कमीत कमी वेळ राहा
ऐकीव माहिती तसेच अफवांवर विश्‍वास ठेवू नका. "सोशल मीडिया'वर कमीत कमी वेळ राहा. आपापले छंद जोपासा. चित्र काढा, वाचन कारा. कुटुंबासोबत वेळ घालावा. काम नसेल, तर घरी असताना मनात अनेक विचार येतात. जास्त विचार करू नका. डोकं शांत ठेवा. सकारात्मक गोष्टींवर विचार करा, मन प्रसन्न ठेवा. कोरोना हा बरा होणारा आजार आहे. नैराश्‍य येत असल्याचे संकेत दिसताच आपल्या जवळच्या मित्राशी संवाद साधा. 
- राजा आकाश, 
ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com