आजारपणात फेल झाल्या तिच्या दोन्ही किडन्या; अखेर आईनं उचललं धाडसी पाऊल; पण...

आजारपणात फेल झाल्या तिच्या दोन्ही किडन्या; अखेर आईनं उचललं धाडसी पाऊल; पण...

नागपूर : नियतीने सायलीची बोलण्याची व ऐकण्याची क्षमता (Ability to speak and listen) लहानपणीच हिसकावून घेतली. एवढ्यावरच तिचे दुःख संपले नाही. कालांतराने ब्रेन स्ट्रोकचा अटॅक (Brain stock attack remedies) येऊन तिच्या दोन्ही किडनी निकामी (Kidney Operation) झाल्या. अशा कठीण परिस्थितीत आयुष्य जगणाऱ्या सायलीच्या मदतीसाठी आता तिची आईच पुढे सरसावली आहे. मुलीचा जीव वाचविण्यासाठी मातेने आपली एक किडनी मुलीला देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र किडनी प्रत्यारोपणासाठी (Kidney Transplantation) लाखोंचा खर्च येणार असल्याने गोगरकर कुटुंबिय चिंतीत आहेत. (mother decide to give kidney to daughter facing money problem)

आजारपणात फेल झाल्या तिच्या दोन्ही किडन्या; अखेर आईनं उचललं धाडसी पाऊल; पण...
'तो' बिबट्या नक्की गेला तरी कुठे? तीन दिवस उलटूनही शोध लागेना

एनआयटी कॉलनी, अत्रे ले-आऊट, प्रतापनगर येथे राहणारे राजक्रिष्ण व वैशाली यांची थोरली मुलगी सायली ही जन्मतःच शंभर टक्के मूकबधिर आहे. २०१३ मध्ये कानाच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेले असता तपासणीदरम्यान तिची किडनी काम करीत नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.

त्यांनी पुढील उपचारासाठी नडियाल (गुजरात) येथील रुग्णालयात रेफर केले. तिथे नियमित उपचार सुरू असताना सायलीला अचानक एकेदिवशी ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला. यात तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या. नागपुरात अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. मात्र ती यातून अद्याप सावरली नाही. गेल्या दोन वर्षांपासून सायली डायलिसिसवर आहे.

२२ वर्षीय सायलीला वाचविण्यासाठी किडनी प्रत्यारोपण हा शेवटचा उपाय आहे. त्यामुळे मुलीच्या जीवासाठी तिच्या आईनेच आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांनी साडे चौदा लाखांचा खर्च सांगितला आहे. एवढा मोठा खर्च करण्याची गोगरकरसारख्या साधारण कुटुंबाची ऐपत नाही. सायलीचे वडील दोन वर्षांपूर्वी महसूल विभागातून सेवानिवृत्त झाले. त्यांनी आतापर्यंत मुलीच्या उपचारावर लाखो रुपये खर्च केले. पगार व पेंशनसोबतच पीएफसुद्धा खर्च झाला.

आजारपणात फेल झाल्या तिच्या दोन्ही किडन्या; अखेर आईनं उचललं धाडसी पाऊल; पण...
'मुख्यमंत्री साहेब, आम्हाला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या'

मदतीचे आवाहन

सायलीचा जीव वाचविण्यासाठी तिला समाजाकडून आर्थिक मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास सायलीला जीवनदान मिळू शकते. इच्छुकांनी राजक्रिष्ण गोगरकर यांच्या एचडीएफसी बँकेतील ०१०२१००००८२८२८ या खात्यात मदत जमा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. एचडीएफसी००००१०२ हा आयएफएससी कोड आहे. (संपर्क क्र. ९८९०३८६०८०)

(mother decide to give kidney to daughter facing money problem)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com