esakal | मातृत्व अनुभवण्यापूर्वीच झाला बाळाचा मृत्यू, महिलेचं कृत्य पाहून उपस्थितांचेही पाणावले डोळे
sakal

बोलून बातमी शोधा

mother ran away by wrapping baby in white paper in nagpur

मध्यरात्री महिला आली असावी, महिला लेबर वॉर्डात जाण्याच्या दिशेने निघाली. परंतु, प्रसूतीच्या वेदना सहन न झाल्याने ती कॅज्युअल्टीच्या आडोशाला बसली.

मातृत्व अनुभवण्यापूर्वीच झाला बाळाचा मृत्यू, महिलेचं कृत्य पाहून उपस्थितांचेही पाणावले डोळे

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : ना जाणे ती कुठून आली. ती कुठली आहे. तिच्यासोबत रक्ताचे नातेवाईक कोणीच नव्हते. मेडिकलच्या कॅज्युअल्टीजवळ काळोख्या रात्री ती प्रसूत झाली. बाळ तेथेच सोडून त्या मातेने पलायन केले. नऊ महिने रक्ताने सिंचन केल्यानंतर काळजाच्या तुकड्याला जन्म दिला. मातृत्वाचा आनंद अनुभवण्यापूर्वीच बाळ दगावल्याचे समजले. त्यामुळे चिमुकल्या बाळाचे शव कागदामध्ये ठेवले आणि ती माता निघून गेली. बाळ मृत असल्याने त्या मातेने पलायन केले. सकाळी ८ वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी तक्रार दाखल केली. त्या मातेचा शोध सुरू झाला आहे. 

हेही वाचा - बहिण प्रियकराला भेटायला गेली, भावाला माहिती मिळाली अन् घडला अंगावर काटा आणणारा थरार

मेडिकलच्या कॅज्युअल्टीजवळ बाळ पांढऱ्या कागदात गुंडाळून असल्याचे दिसताच एका वाहनचालकाने मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना खबर दिली. तत्काळ दखल घेत सीएमओ कॅज्युल्टीबाहेर आले. त्या नवजात बाळाला (मुलगा) बघितले. जिवंत आहे की, मृत याची तपासणी केली. बाळ मृत असल्याचे समजताच पोलिसांना सांगितले. प्रसूतीदरम्यान बाळ दगावल्यानेच त्या मातेने बाळाला सोडून पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. बाळाला सोडून गेलेल्या महिलेचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. 

हेही वाचा - वर-वधू मंडपात उभे झाले, डोक्यावर अक्षता पडणार इतक्यात काही जण धडकले अन् उडाला थरकाप

कळा मध्यरात्री - 
मध्यरात्री महिला आली असावी, महिला लेबर वॉर्डात जाण्याच्या दिशेने निघाली. परंतु, प्रसूतीच्या वेदना सहन न झाल्याने ती कॅज्युअल्टीच्या आडोशाला बसली. मध्यरात्रीनंतर सामान्य प्रसूतीतून मुलगा झाला. मात्र, तो मृत असल्याने ती माता उपचारासाठी दाखल होण्याऐवजी ती आल्यापावली परत गेली. विशेष असे की, ज्या ठिकाणी बाळाचे शव कागदात गुंडाळून ठेवले तेथे सीसीटीव्ही कॅमेरे पोहोचू शकत नाही. 

loading image
go to top