भंडारा : वाळू वाहतुकीच्या टिप्परने मायलेकाचा घेतला बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घटनास्थळी जमलेली गर्दी व पोलिस कर्मचारी.

भंडारा : वाळू वाहतुकीच्या टिप्परने मायलेकाचा घेतला बळी

वरठी (जि. भंडारा) - सातोना-नागपूर मार्गावर मोहदुराजवळील वळणावर वाळू वाहतुकीच्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालकासह त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. मृतांची नावे राजू श्यामराव रहांगडाले (वय २६) व गीता राहांगडाले (वय ५०, रा. वाठोडा, नागपूर) अशी आहेत. हा अपघात सोमवारी (ता. २) सकाळी ९ च्या सुमारास झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील राजू रहांगडाले आपल्या आईसोबत तिरोडा येथे जात होते. शहापूरवरून मोहदुरामार्गे वरठीकडे येत असताना वाळू घेऊन नागपूरकडे भरधाव जात असलेल्या टिप्परने (क्रमांक एमएच ३६ एए ६४६१) दुचाकीला जोरदार धडक दिली. यात समोरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी होऊन राजू रहांगडाले व गीता रहांगडाले या मायलेकांचा जागीच मृत्यू झाला झाला. टिप्पर चालक अजित हेमराज भोयर (वय २६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वाहन मालकाचे नाव समीर समरीत, रा. डोंगरगाव असे आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले आहेत. आरोपी चालकावर गुन्हा नोंदविला असून वरठीचे पोलिस निरीक्षक मेश्राम, सहायक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी तपास करीत आहेत.

Web Title: Mother Son Killed Sand Transport Tipper

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top