MSEDCL : शंका असल्यास स्वतः तपासा वीजबिल; महावितरणने केले घरगुती वीज ग्राहकांना आवाहन

उन्हाळ्यात पंखा, रेफ्रिजरेटर, एसीचा वापर वाढतो. पण उपकरणांच्या वापरानुसार वीजबिल आपल्याला आले की नाही? अशी शंका निर्माण होते.
MSEDCL
MSEDCL Sakal

Nagpur News : उन्हाळ्यात पंखा, रेफ्रिजरेटर, एसीचा वापर वाढतो. पण उपकरणांच्या वापरानुसार वीजबिल आपल्याला आले की नाही? अशी शंका निर्माण होते. त्यामुळे आपल्या विजेचा वापर व आलेले बिल योग्य आहे की नाही, याची खातरजमा संकेतस्थळ, ॲप आणि वीज बिलातच होत असल्याचा दावा महावितरणने केला आहे.

बिलाच्या मागे वर्गवारी निहाय वीज देयकाचे प्रती युनिट दर दिलेले असतात. त्यामध्ये ० ते १००, १०१ ते ३००, ३०१ ते ५००, ५०१ ते १०००, १००१ आणि अधिक युनिट वीज वापरासंदर्भातील दर छापलेले असतात.

त्यामुळे एखाद्या महिन्यात जास्त वीज युनिट वापरल्यास त्याचे दरही त्या तुलनेत वाढत असतात. उपकरणांचे वॅट, त्यांचा दैनंदिन वापर याची माहिती झाल्यास वीजबिलाचे नियोजन करण्यासाठी वापरावर लक्ष ठेवून बिल कमी करता येईल व आलेले बिल एवढे का, याचा उलगडा नक्कीच होईल.

असे तपासून घ्या आपले बिल

प्रकार - वीज वापर (वॅट्स) - एक युनिटसाठी लागणारा वेळ

बल्ब- २४/४०/६०/१०० - ४०/२५/१६/१० तास

पंखा- ३६ इंच ६० - १६ तास ४० मिनीट

पंखा- ४२ इंची --८० - १२ तास ३० मिनीट

मिक्सर, ज्युसर -४५० - २ तास १३ मिनीट

टीव्ही -१५ - ६६ तास ४० मिनीट

वॉशिंग मशिन -२००० - ३० मिनीट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com