

MSRTC Extends Temporary 10% Fare Increase for Ordinary Bus Services
sakal
नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(एसटी)ने साध्या बससेवेच्या दहा टक्के भाडेवाढीला मुदतवाढ दिली आहे. ही मुदत आता ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना याच दराने तिकीट घ्यावे लागेल. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळी गर्दीच्या हंगामात साध्या बस गाड्यांसाठी १० टक्के परिवर्तनशील भाडेवाढ लागू केली होती.