महापालिकेत भाजप-मनसेची युती!

राज ठाकरे यांचा १७ सप्टेंबरचा दौरा ठरला
Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal Corporation

नागपूर : महाविकास आघाडीची एकत्रित ताकद कमी करण्यासाठी नागपूर महापालिकेची निवडणूक भाजप आणि मनसे एकत्रित लढणार असल्याचे जवळपास ठरले आहे. याची चाचपणी करण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे नागपूरला येत आहे. १७ आणि १८ सप्टेंबर असा दोन दिवसांचा त्यांचा दौरा निश्चित झाला आहे.

भाजप आणि शिवसेनेतील मतभेद टोकाला गेले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची युती होणे शक्य नाही. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर भाजपला रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकासुद्धा एकत्रितपणे लढण्यासाठी मास्टर प्लान आखला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यापूर्वीच महाविकास आघाडीने एकत्रित लढावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याने काँग्रेस यास फारसा विरोध करणार नाही. मात्र विदर्भ आणि खासकरून नागपूरमधील काँग्रेसच्या नेत्यांचा आघाडीला विरोध आहे. नागपूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नाही

सेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे. त्यामुळे काँग्रेस दीडशे पैकी पन्नास जागाही सोडायला तयार नाही. त्यांची ताकद वाढवून पायावर धोंडा मारून घ्यायचा नाही असे स्थानिक नेत्यांचे म्हणने आहे. आघाडी एकत्रित लढल्यास बऱ्यापैकी भाजपला रोखू शकते. वेळेवर वरिष्ठांकडून दबाव आल्याने आघाडी होण्यास कोणी रोखू शकणार नाही असे सर्वांचेच म्हणने आहे. त्यामुळे भाजप सावध आहे. मात्र शिवसेनेची ताकद वाढणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन व्हावे याकरिता भाजपचीही गुप्त तयारी सुरू आहे. ज्या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे अशा भागात मनसेचे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दोनचार टक्के मतांचे विभाजन झाले तरी भाजपचा उद्देश साध्य होणार आहे. मनसेने प्रखर हिंदुत्वाची भूमिक घेतल्याने ती भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. नव्‍या समीकरणामुळे महापालिकेत मनसेचे खाते पुन्हा उघडू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com