esakal | महागाईमुळे नगरसेवकांची कोंडी; रस्त्यांची जुनी कामे थंडबस्त्यात, सिमेंटच्या दरात वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

महागाईमुळे नगरसेवकांची कोंडी; रस्त्यांची जुनी कामे थंडबस्त्यात

महागाईमुळे नगरसेवकांची कोंडी; रस्त्यांची जुनी कामे थंडबस्त्यात

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : महानगरपालिकेची निवडणूक (Municipal elections) अवघ्या काही महिन्यांवर आली असताना विकासकामे खोळंबली आहेत. कार्यादेश झालेली जुनी कामे रोखली आहेत. त्यातच आता सिमेंटसह अन्य बांधकाम साहित्यांचे दर २५ ते ४० टक्क्यांच्या आसपास वाढल्याने कामे कसे पूर्ण (Development work was delayed) होतील याची चिंता नगरसेवकांना (Corporator) लागली आहे. जुनी कामे रोखल्याने निवडणुकीच्या काळात जनतेसमोर कसे जावे, असा प्रश्न नगरसेवकांना (Inflation halted work) सतावत आहे. त्यामुळे महागाईमुळे थांबलेली कामे आणि आगामी (Increase in cement prices) मनपा निवडणूक अशा कोंडीत नगरसेवक सापडले आहेत. (Municipal-elections-Development-work-was-delayed-Corporator-Inflation-halted-work-Increase-in-cement-prices)

कार्यादेश झालेली विकासकामे रोखल्याने नगरसेवकांत असंतोष आहे. आता सिमेंट, बांधकाम साहित्य, रेती, गिट्टीच्या रॉयल्टी दरातही २५ ते ४० टक्के वाढ झाली. त्यामुळे जुन्या दराप्रमाणे निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांचाही उत्साह मावळला. जुनी कार्यादेश झालेली जवळपास ५० कोटींची कामे थंडबस्त्यात गेल्याची महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीपुढे नगरसेवकांची कोंडी होणार आहे.

हेही वाचा: चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

महापालिकेची आर्थिक स्थिती बघता तुकाराम मुंढे यांनी सर्वच कामांच्या फाइल रोखल्या होत्या. मुंढे गेल्यानंतर आलेले आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही फाईल रोखल्या. प्रभागातील कामे रोखल्याने नगरसेवकांचा संतापामुळे आयुक्तांनी काही कामे सुरू करण्याची परवानगी दिली. परंतु, कार्यादेश झालेली तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली कामे बहुसंख्य कामे रोखण्यात आली. अशावेळी कामांच्या पुनर्निविदा काढण्याचा पर्याय महापालिका प्रशासनाने शोधला आहे.

मते कशी मागायची?

पुनर्निविदा प्रक्रिया सुरू झाल्यास कामे सुरू होण्यास आणखी विलंब होणार आहे. पुढील वर्षी निवडणूक असून प्रत्येकच नगरसेवक प्रभागातील कामे जलदगतीने व्हावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत. कामे रखडली तर निवडणुकीत जनतेपुढे कुठल्या भरवशावर मत मागायचे? असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. कार्यादेश तसेच निविदा झालेली ५० कोटींची कामे रखडणार असल्याचे चिन्हे असून नगरसेवकांत धडकी भरली आहे.

जुनीच कार्यादेश झालेली कामे करण्यावर भर आहे. नवीन एकही निविदा मंजूर केली नाही. जुनी कामे कंत्राटदार करणार नाही तर नव्या निविदा काढाव्या लागतील. जुन्याच दराने काम करण्यास कंत्राटदार तयार असेल तर त्यांचे स्वागत आहे. परंतु त्यांच्याकडून तसे लेखी लिहून घेतले जाईल.
- प्रकाश भोयर, अध्यक्ष, स्थायी समिती, मनपा

हेही वाचा: भाकरी महागली! सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसं?

वॉर्ड निधीच्या फाईल्स तयार होत आहेत. परंतु कामे होतील, याबाबत शंका आहे. आयुक्तांवर महापौर, स्थायी समिती अध्यक्षांचे नियंत्रण नाही. आयुक्त कोरोनाची तिसरी लाट येण्याची प्रतीक्षा करीत आहे. जेणेकरून विकासकामे ठप्प करता येईल.
- तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते, मनपा

(Municipal-elections-Development-work-was-delayed-Corporator-Inflation-halted-work-Increase-in-cement-prices)

loading image