
नागपूर : खून करायचा पण पोलिसांच्या हातात लागायचे नाही, असा आरोपी अलोक मातूरकरचा डाव होता. त्यासाठी तो मोबाईलमधील ‘क्राईम थ्रिलर’ आणि क्राईम पॅट्रोल (Crime Patrol) अशा मालिका सतत बघत होता. त्यामुळेच युट्यूबवरील व्हिडिओ बघूनच अलोकने हत्याकांड (Maturkar massacre after watching a video on YouTube) घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार सर्च हिस्ट्रीचा उघडकीस आला आहे. (Murder-at-the-sight-of-Crime-Patrol-Maturkar-murder-case)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेव्हणी अमिषा बोबडे हिच्यासोबतच्या अलोकच्या अनैतिक संबंधाची माहिती पत्नी विजयासह कुटुंबातील अन्य सदस्यांना होती. त्यामुळे त्यांनी अमिषासोबतचे अलोकचे संबंध मान्यच केले असावेत, असा अंदाज जप्त ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. परंतु, अलोकची अमिषावर १३ व्या वर्षांपासूनच नजर होती. तेव्हापासूनच तो तिच्याशी चाळे करीत होता.
अमिषा स्वच्छंद स्वभावाची असल्यामुळे तिला अलोकचे बंधने नको होते. त्यामुळेच तिने अलोकचे दोन्ही नंबर ब्लॉक केले होते. अलोकच्या लैंगिक अत्याचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमिषाने तहसील पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रारही दिली होती. त्याचाच राग अलोकच्या मनात होता. अमिषा ही अलोकच्या अत्याचाराबाबत पुरावे गोळा करीत होती. त्याचाच भाग म्हणून अलोक घरी येताच ती मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू करीत होती. घटनेच्या दिवशीसुद्धा अमिषाने पुरावे गोळा करण्यासाठी रेकॉर्डिंग सुरू केली होती.
दोन जीबी ब्ल्यू फिल्म
अलोक हा मानसिक विकृत होता. त्याच्या मोबाईलमध्ये जवळपास दोन जीबी एवढ्या ब्ल्यू फिल्म्स आढळून आल्या आहेत. तसेच त्याच्या यु-ट्यूब सर्च हिस्ट्रीमध्ये हत्याकांडांसंबंधीत असलेले व्हिडिओ सर्च केल्याचे पुरावे आहेत. तसेच ‘पोलिस मोबाईल लोकेशन कसे काढतात?’ याचेही व्हिडिओ बघून अभ्यास केला होता.
परी आणि अलोकची डिएनए टेस्ट
१४ वर्षांची मुलगी परी ही आपली मुलगी नाही, असे त्याला वारंवार वाटत होते. त्याच कारणामुळे त्याने परीला अत्यंत क्रूरपणे ठार केले असावे, अशी शक्यता आहे. मुलगा साहीलला याचे उशीने तोंड दाबून ठार केले. परंतु, परीचे हातपाय दोरीने बांधले. तिचे डोके हातोडीने ठेचले. त्यामुळे परी आणि अलोकची डिएनए टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(Murder-at-the-sight-of-Crime-Patrol-Maturkar-murder-case)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.