esakal | ॲमेझॉनवरून बोलावला चाकू अन् केला मित्राच्या मामाचा ‘गेम’
sakal

बोलून बातमी शोधा

ॲमेझॉनवरून बोलावला चाकू अन् केला मित्राच्या मामाचा ‘गेम’

ॲमेझॉनवरून बोलावला चाकू अन् केला मित्राच्या मामाचा ‘गेम’

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : भाच्याला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी मामा येत असून तो जीवे सोडणार नाही, या भीतीने पाच युवकांनी मित्राच्या मामाचा गेम केला. ही थरारक घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या परिसरात घडली. अतुल रामकृष्ण धकाते (३५, रा. धम्मदीपनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांना पाचही आरोपींना अटक केली आहे. (Murder-In-Nagpur-Crime-News-Murder-to-save-lives-nad86)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनीष शाहू ऊर्फ डब्ल्यू, तुषार वर्मा, अंकित नेमीचंद इवनाते, पप्पू शामलाल निर्मलकर, सुनील यांनी त्यांचा मित्र पीयूषला रविवारी जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेऊन उपचार केले. पीयूषने मामा अतुल धकाते यांना पाचही मित्रांनी मारहाण केल्याची माहिती दिली. त्यामुळे मामा संतापला. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता अतुलने आरोपींना जाब विचारण्यासाठी फोन केला. ते सर्वजण शौर्य जीमजवळ उभे होते.

हेही वाचा: सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

पीयूषचा मामा येत असल्यामुळे पाचही जण घाबरले. मनीष शाहूने चक्क अतुलचा गेम करण्याची आयडिया मित्रांना दिली. अतुल दारूच्या नशेत असून तो एखाद्याचा खून करू शकतो. तत्पूर्वी, आपणच त्याचा गेम करू, असे आरोपींनी ठरवले. काही मिनिटातच अतुल तेथे आला. त्याने भाचा पीयूषला मारहाण केल्याचा जाब विचारला. पाचही आरोपींना अतुलला घेरले आणि धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात अतुल पडल्यानंतर त्याला मृत झाल्याचे समजून आरोपी पळून गेले.

घटनेच्या जवळपास तासाभरानंतर यशोधरानगर पोलिसांना घटनेची माहिती कळली. पोलिस वेळेवर पोहोचले असते तर अतुलचा जीव वाचला असता. अतुलवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी दुपारी दोन वाजता अतुलाच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मनीष शाहू ऊर्फ डब्ल्यू, तुषार वर्मा, अंकित नेमीचंद इवनाते, पप्पू शामलाल निर्मलकर, सुनील यांच्यावर हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे. यशोधरानगर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच अतुलचा जीव गेल्याची चर्चा आहे. या संदर्भात पीआय संजय जाधव यांना फोन केला असता त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही.

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

ॲमेझॉनवरून बोलावला चाकू

गेल्या आठवड्यापूर्वीच तुषार वर्माने ॲमेझॉन शॉपिंग वेबसाइटवरून धारदार चाकू मागवला होता. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वीच शॉपिंग ॲप व्यवस्थापकांशी चर्चा करून कुणीहा शस्त्र-चाकू ऑर्डर केल्यास पोलिसांना कळवावे, अशा सूचना केल्या होत्या. परंतु, ॲमेझॉनवरून शस्त्र बोलावून खून केल्याची ही पाचवी घटना असल्याची माहिती आहे.

(Murder-In-Nagpur-Crime-News-Murder-to-save-lives-nad86)

loading image