esakal | सिद्धेश्वर मजुरीचे सोळाशे रुपये घेऊन जात असताना लाली गालावर चोप देऊन निघून गेला, पुढे...
sakal

बोलून बातमी शोधा

Murder of a young man over a gambling money dispute

घटनास्थळावरून लाली व जाहिदला त्याच्या मित्रांनी उचलून आशा हॉस्पिटल कामठी येथे नेले. घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळावर खापरखेडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची चमू दाखल झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे विरेंद्र नरड, खापरखेडा पोलिस ठाण्याचे नितेश पिपरोदे आणि नुमान शेख या तिघांनी मिळून गुप्त माहितीच्या आधारावर अंकित यादव यांच्या घरून सिद्धेश्वर आणि अमरनाथ यांना ताब्यात घेतले.

सिद्धेश्वर मजुरीचे सोळाशे रुपये घेऊन जात असताना लाली गालावर चोप देऊन निघून गेला, पुढे...

sakal_logo
By
दिलीप गजभिये

खापरखेडा (जि. नागपूर) : जुगारातील पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद उद्भवला. यानंतर सिल्लेवाडा येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता सिद्धनाथ यादव आणि अमरनाथ यादव या दोन भावांनी मिळून लाली हसन खान आणि जाहिद हसन खान या दोघा भावांवर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोघेही फरार झाले. लाली खान याचा कामठीत उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर जाहिदवर उपचार सुरू आहेत. ही घटना सिल्लेवाडा येथील वार्ड क्र. ४ येथे सिद्धेश्वर याच्या घरासमोर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरीचे पैसे घेऊन सिद्धेश्वर घरी जात होता. दरम्यान, लालीने त्याच्या जवळचे १,६०० रुपये हिसकावून घेतले आणि त्याचा गालावर चोप देऊन निघून गेला. यानंतर सिद्धेश्वर घरी गेला. त्याच्यापाठेपाठ लाली व त्याचा भाऊ जाहिद दोघेही त्याच्या घरी जाऊन मारझोड सुरू केली. हे बघून अमरनाथ तेथे आला. सिद्धेश्वर याने लोखंडी पाईपने मारून लाली व जाहिद यांना गंभीर जखमी केले व पसार झाले. तेथून ते अंकित यादव याच्या घरी जाऊन लपून बसले.

क्लिक करा - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचवला कोविड नियंत्रणासाठी उपाय, वाचा काय म्हणाले ते...

घटनास्थळावरून लाली व जाहिदला त्याच्या मित्रांनी उचलून आशा हॉस्पिटल कामठी येथे नेले. घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळावर खापरखेडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची चमू दाखल झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे विरेंद्र नरड, खापरखेडा पोलिस ठाण्याचे नितेश पिपरोदे आणि नुमान शेख या तिघांनी मिळून गुप्त माहितीच्या आधारावर अंकित यादव यांच्या घरून सिद्धेश्वर आणि अमरनाथ यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी लोखंडी पाईप जप्त केला. घटनास्थळावर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट दिली. ठसे तज्ज्ञांची चमू दाखल झाली. दोन्ही आरोपीस अटक करण्यात आली.

लाली खानची गुन्हेगारी पार्श्वभूमी

स्थानींकाच्या चर्चेनुसार लाली आणि सिद्धेश्वर हे दोघे मित्र आहेत. जुगाराच्या पैशाच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद झाला व ही घटना घडली. या प्रकरणातील मृत लाली खान याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर खापरखेडा पोलिसांत गुन्ह्याची नोंद असल्याचे सांगण्यात येते. अधिक तपास खापरखेडा पोलिस करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top