नागपूर : दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide case

नागपूर : दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नागपूर - अभ्यासात हुशार असलेल्या एका दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला नुकत्याच दहावीच्या निकालात ८० टक्के गुण मिळाले होते. महिमा अमित मसराम (१५) रा. जयनगर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी १. ४५ वाजताच्या सुमारास घडली.

महिमाचे वडील अमित पेंटिंगचे काम करतात आणि आईही कामाला जाते. काही दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल लागला होता. त्यात महिमाला चांगले गुणही मिळाले होते. चांगल्या निकालामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. आई-वडिलांनी मुलीच्या महाविद्यालयात प्रवेशाची तयारीही केली होती. सोमवारी दुपारी ती काही कागदपत्र बनविण्यासाठी वडिलांसोबत ई-सेवा केंद्रावर गेली होती. दुपारी १ वाजताच्या सुमारास ती घरी परतली. तिचे भाऊ परिसरातच खेळायला गेले होते. महिमा घरी एकटीच होती. तिने आतून दार बंद करून घेतले आणि छताच्या बल्लीला साडी बांधून गळफास लावला.

भाऊ खेळून घरी परतले. त्यांनी दार ठोठावले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अनेकदा आवाज देऊनही महिमाने उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून आत डोकावले असता महिमा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. आरडा-ओरड ऐकून शेजारी गोळा झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

अंबाझरी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. महिमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. चांगले गुण मिळाल्यानंतरही महिमाने आत्महत्या का केली, असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. या घटनेचा महिमाच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Nagpur 10th Student Committed Suicide Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..