नागपूर : ८५ टक्के कुटुंबांकडे स्मार्टफोन

शैक्षणिक स्थितीचा अभ्यास; असर पाहणीत आले वास्तव समोर
Nagpur 85% of households have smartphones
Nagpur 85% of households have smartphones sakal

यवतमाळ : प्रथम संस्थेमार्फत देशातील ५८१ जिल्ह्यांमधील १७ हजार १८४ गावांमध्ये कुटुंबाची शिक्षणाची वार्षिक स्थिती दर्शक अहवाल (असर) २०२१ ही पाहणी घेण्यात आली. या पाहणीत महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांतील ९९० गावांचा समावेश होता. कोविडच्या काळात स्मार्टफोनची संख्या वाढून ८५ टक्क्यांवर आल्याची माहिती असर पाहणीत समोर आली आहे.

प्रथम संस्थेमार्फत करण्यात आलेल्या असर पाहणीदरम्यान ११ हजार २८१ कुटुंबे व पाच ते १६ वर्षे वयोगटातील चार हजार २३ मुलांच्या शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यात आला. कोविड-१९ महामारीचा शाळा व मुलांच्या शिक्षणावरील परिणामांचा अभ्यास करणे हा या पाहणीचा उद्देश होता. सरकारी शाळांमध्ये सहा ते १४ वर्षे वयोगटातील २०१८मधील मुलांची पटसंख्या ६०.५० टक्के होती. त्यात वाढ होऊन २०२१मध्ये ६९.७० टक्के झाली. २०१८मध्ये स्मार्टफोन असणार्‍या कुटुंबांची संख्या ४२.३० टक्के होती.

२०२१मध्ये ८५.५० टक्क्याने वाढून दुप्पट झाली. घरामध्ये किमान एक स्मार्टफोन उपलब्ध आहे. अशा मुलांपैकी १०.३ टक्के मुले अभ्यासासाठी त्याचा वापर करू शकले नाहीत. तर ६२.७ टक्के मुलांना स्मार्टफोन काही वेळ उपलब्ध होता. फक्त २७ टक्के मुलांना पूर्णवेळ स्मार्टफोन उपलब्ध होता. कोविडच्या काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांना मोबाईल विकत घ्यावा लागला. त्याचाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.

मुलांना मोबाईलचे वेड

ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या हातात स्मार्टफोन देण्यात आलेत. फक्त २७ टक्के मुलांना पूर्णवेळ स्मार्टफोन उपलब्ध होता. आता आफलाईन शिक्षण सुरू झाले आहे. तरीही मुलांना स्मार्टफोनचे लागलेले वेड कमी होत असल्याचे दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com