नागपूर : बिटकॉईनच्या नावावर ९ लाखाची फसवणूक

२० ते ३० टक्के नफा देण्याचे आमिष देत ९ लाखाने फसवणूक
Nagpur Bitcoin fraud
Nagpur Bitcoin fraud

नागपूर : बीटकॉईनमध्ये गुंतवणूक करीत, त्यातून २० ते ३० टक्के नफा देण्याचे आमिष देत ९ लाखाने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अजय गोविंद दोडमनी (वय २९, रा.हाउसींग बोर्ड कॉलनी, जवारी नगर, संकवाळ, गोवा) आणि सुकांता रणजीत भौमिक (वय ४०, रा. पणजी, गोवा) अशी आरोपींची नावे आहेत. सुकांता या मुळच्या कलकत्ता येथील आरलन्स डाउन टेरीस देशप्रिया पार्क येथे राहणाऱ्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवतळे ले-आउट येथे राहणारे अविनाश रघुनाथराव वसुले (वय ४८) यांनी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इंटरनेटवर शोध सुरू केला. यावेळी त्यांनी अजय दोडमनी आणि सुकांता यांचेशी संपर्क साधला. त्यांनी अविनाश वसुले यांना विविध प्रकारचे ऑफर देऊन केलेल्या गुंतवणुकीवर दहा, वीस, तीस टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले.

यावेळी त्यांचाच नव्हे तर त्यांच्या मित्रांचाही विश्‍वास संपादन करीत, त्यांना गुंतवणुक करण्यास सांगितले. त्यातून अविनाश यांनी आरोपीच्या त्यांच्या कोटक महेंद्रा बॅँकेत खात्यावर ४ ऑगस्टपासून वेळोवेळी ७ लाख टाकले. यानंतर अविनाश यांनी त्यांच्या आईच्या खात्यातून ९ ऑगस्टला २ लाख असे एकुण ९ लाख आरोपीच्या खात्यात जमा केले. तसेच १० ऑक्टोबरला ‘इबीएक्स अॅप’वरून ०.५८२५१ बिटकॉइन, व ‘झेब-पे’ या अॅपवरून ०.०९४१८, ०४७ बिटकॉइन आरोपींना पाठवले. त्यातून आरोपींनी खात्यात पैसे जमा होताच कंपनी पैसे जमा झाल्याबाबत मेल पाठविला. मात्र, त्यानंतर त्यांनी परतावाच दिला नसल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com