‘फिल्मफेअर’ मिळवून देणारा नागपूरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Abhijit Kokate

‘फिल्मफेअर’ मिळवून देणारा नागपूरकर

नागपूर : काही माणस आपल्या सहवासात राहूनही आपल्याला त्यांचे मोठेपण लक्षात येत नाही. नेमके हेच अभिजित कोकाटे या कलावंताच्या बाबतीत झाले. बॉलिवूडमधील तो एक प्रसिद्ध चित्रपट एडिटर असून अभिनेत्री कंगणा राणौतच्या गाजलेल्या ‘क्वीन’ चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. नागपूरकर कलावंताला मिळालेला हा पहिला फिल्मफेअर आहे, हे विशेष.

सेंट झेवियर हायस्कूलमधून अभिजितने प्राथमिक शिक्षण, नागपूर विद्यापीठातून प्रथम विधि शाखेमध्ये पदवी आणि नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र, विधि शाखा करिअर म्हणून न निवडता बॉलिवूडचा मार्ग निवडला. अभिजितने २०११ मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता राम गोपाल वर्मा यांच्यासोबत चित्रपट एडिटर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. सध्या तो दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यप यांच्यासोबत काम करत आहेत. त्याने द वैनिशिंग हिचहाइकर या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. त्यासाठी त्याला ४८ हवर फिल्म प्रोजेक्टद्वारे आयोजित ‘मेमोरेबल स्टोरीज शॉर्ट फिल्म’ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे.

बॉलिवूडमधील कारकीर्द

मुख्य चित्रपट एडिटर

 • नॉट अ लव्ह स्टोरी (२०११)

 • डिपार्टमेंट (२०१२)

 • ॲटॅक्स ऑफ २६/११ (२०१३)

 • क्वीन (२०१४)

 • ब्लाऊज (२०१४)

 • पोस्टर बॉइज (२०१४)

 • टिटू एमबीए (२०१४)

 • अब तक छप्पन २ (२०१५)

तांत्रिक कौशल्यात हातखंडा

 • ट्रेलर, विएफएक्स, मेकिंग : मसान, क्वीन, डी डे, किस्सा पंजाब, मेरी कॉम, बॉम्बे वेल्वेट, शानदार आदी ट्रेलर.

 • पॅकेजिंग पोस्ट-प्रॉडक्शन : कॉन्ट्रक्ट, फूंक, अग्यात, रण, रक्त चरित्र भाग १ व २, नॉट अ लव्ह स्टोरी, डिपार्टमेंट, ॲटॅक्स ऑफ २६/११.

 • दिग्दर्शन : ऑफ रोड विथ गुल पनाग (२०१५, डिस्कव्हरी चॅनल), राखोश (२०१९, चित्रपट).

Web Title: Nagpur Abhijit Kokate Won Filmfare Award Bollywood Editor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top