Agriculture:पंचायत कृषी विभाग झोपेत! तालुका कृषी विभागाचा अजब खाक्या, कृषी विभाग म्हणतो.. नुकसानच नाही

ढगाळ वातावरणामुळे कापूस, तूर व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याकडे तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाने पाठ फिरवली आहे.
Unseasonal rain water accumulated in onion crop.
Unseasonal rain water accumulated in onion crop.esakal

Unseasonal Rains Agricultural Crops Damage:हिंगणा तालुक्यात नोव्हेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे कापूस, तूर व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याकडे तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाने पाठ फिरवली आहे. या विभागातील एकहीकर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलानसल्याची ओ सुरू आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हिंगणा तालुक्यात कापूस, तूर,हरभरा, सोयाबीन, भाजीपाला पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. यावर्षीच्या खरीप हंगामात पाऊस बऱ्यापैकी झाल्याने कापूस, सोयाबीन पीक सध्या शेतात आहे. कापसाला

बोंडही मोठ्या प्रमाणात आली आहे. शेतात कापूस पीक बऱ्यापैकी डोलत असतानाच नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. डिसेंबर महिन्यातही अवकाळी पाऊस सुरू आहे. कापसाची बोंडे भिजल्याने कापूस पिवळा पडत आहे. कापसाची बोंड काळी झाली आहेत. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होणार आहे. शिवाय कापसाची प्रतवारीही घसरणार असल्याचे चित्रदिसून येत आहे. भाजीपाला पिकांमध्ये फुलकोबी, टमाटर, भेंडी, चवळी व वांगे पिकाला जबर फटका बसला आहे.

कान्होलीबारा, गुमगाव, अडेगाव,कवडस, सावळी बिबी, देवळी, पेंढरी परिसरातील भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणात अळ्या पडल्या आहेत. यामुळे कोबी उत्पादक शेतकऱ्यांनी मजूर लावून कोबी तोडणे सुरू केले आहे. संपूर्ण पीक वाया जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे तुरीचे पीक झोपले आहे. (Latest Marathi News)

अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही तालुका कृषी विभागातील अधिकारी व पंचायत समिती कृषी विभागातील अधिकारी कार्यालयात बसूनच पीक नुकसान झाले नसल्याचे सांगत आहेत.तालुका कृषी अधिकारी दिपाली

Unseasonal rain water accumulated in onion crop.
Nagpur: रेल्वे स्थानकात बॉम्ब घेऊन जाणाऱ्या दहशतवाद्याला लोहमार्ग पोलिसांनी बसवलं गुडघ्यावर ! एटीएसकडून रंगीत तालीम

कुंभार व यांच्या कार्यालयातील एकही कर्मचारी पीक सर्वेक्षणासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याची ओरड शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. हिंगणा तालुका कृषी कार्यालयातील ७० टक्के कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग व हिवाळी अधिवेशनाच्या कामावर तैनात करण्यात आले आहे. यामुळे कार्यालय कर्मचाऱ्यांविना ओस

पडल्याचे दिसून येत आहे. हिंगणा पंचायत समिती कार्यालयाच्या खुर्च्या सदैव रिकाम्या असतात. कृषी विभाग दुर्लक्षित झाला असल्याचे सल्याचे चित्र दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मोलाची मदत करणारा कृषी विभागच दुर्लक्ष करीत शेतकऱ्यांनी कोणाकडे आशेने बघावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Unseasonal rain water accumulated in onion crop.
Bhandara News: आरोग्य सेविकेवर प्राणघातक हल्ला! आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कृषी विभागाचा अहवाल थंडबस्त्यात

■ अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी आमदार समीर मेघे यांनी केली. तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाने अद्यापही या नुकसानीचा अहवाल तयार केला नाही. उलट नुकसान झाले नसल्याचे या विभागाकडून सांगण्यात येत आहे. तहसील कार्यालयातील पीक नुकसानीची नोंद करणारा विभागही या दोन्ही यंत्रणांकडून

नुकसानीचा अहवाल आला नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे अवकाळीच्या नुकसानीचे सर्वेक्षणच या दोन्ही विभागांनी केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत आता या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

Unseasonal rain water accumulated in onion crop.
Maratha Reservation : आरक्षण न देणे सरकारला जड जाईल - मनोज जरांगे पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com