Nagpur Air Pollution Worsens
esakal
उपराजधानीतील सर्वाधिक पॉश व स्वच्छ मानला जाणारा सिव्हिल लाइन्स परिसर जानेवारी महिन्यात प्रदूषणाच्या बाबतीत अव्वल ठरला. या परिसरात ३१ पैकी तब्बल ३० दिवस हवा प्रदूषित नोंदली गेली. त्यापैकी २५ दिवस ‘मध्यम’ तर ९ दिवस ‘जास्त प्रदूषित’ या श्रेणीत होते, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.