Accident News: तिघांना उडवून कार खड्ड्यात कोसळली ;एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी ; खापरी शिवारातील घटना

Car Crosses Divider on Nagpur-Amravati Highway : खापरी शिवारात भरधाव कार दुभाजक ओलांडून विरुद्ध मार्गावर गेली. दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तिघांना धडक दिल्यानंतर कार खड्ड्यात कोसळली. अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले.
A Swift Dzire car crashed into a roadside pit after crossing the divider on the Nagpur-Amravati highway near Khapri.

A Swift Dzire car crashed into a roadside pit after crossing the divider on the Nagpur-Amravati highway near Khapri.

esakal

Updated on: 

कोंढाळी, : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील खापरी शिवारात कलकत्ता ढाब्यासमोर भरधाव स्विफ्ट डिझायर कार अनियंत्रित होऊन दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेला गेली. रस्त्यालगत दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तिघांना कारने ५० ते ७५ मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर कार तीन पलट्या घेऊन १५ ते २० फूट खोल खड्ड्यात कोसळली.

Loading content, please wait...