esakal | Nagpur : अनिल देशमुखांनी ईडीला सामोरे जावे
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : अनिल देशमुखांनी ईडीला सामोरे जावे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने लुक आउट नोटीस बजावल्याचे प्रसिद्धी माध्यमातूनच कळाले. देशमुखांनी कारवाई रोखण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर ईडीला सामोरे जाणे हाच एकमेव उत्तम पर्याय असल्याचा सल्ला माजी मुख्यमंत्री तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांमुळे देशमुखांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या घरी, कार्यालय तसेच प्रतिष्ठानांवर छापे घालण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या दोन स्वीय सहाय्यकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. उच्च न्यायालयानेसुद्धा कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे देशमुखांमसोर आता दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ते समोर येत नसल्याने लूक ऑउट नोटीस ईडीने बजावली असावी असे फडणवीस म्हणाले.

करुणा शर्मा यांची चौकशी झाली पाहिजे. कोणीतरी त्यांच्या मोटारीत बंदूक ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी आजपासून

आघाडी लचके तोडण्यासाठी

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी राज्याचा कारभार चालवण्यासाठी नव्हे तर लचके तोडण्यासाठी झाली आहे. प्रत्येकाजण लचके तोडत आहे. काही जमले नाही तर आपसातच भांडत आहे. प्रत्येक जण मिळेल तशी संधी साधत आहे. आघाडीला जनतेशी काही देणेघेणे नसल्याचेही नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- देवेंद्र फडणवीस

देशमुखांबाबत भूमिका स्पष्ट करावी : उपाध्ये

महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत राज्याचा माजी गृहमंत्री अनेक महिन्यांपासून गायब आहे. महाराष्ट्राला ही गोष्ट भूषणावह नाही. माजी गृहमंत्री देशमुख यांच्या गायब होण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली.

loading image
go to top