ASHA Workers: आशा सेविकांच्या पदरी अजूनही न्याय नाहीच! अजित पवारांच्या बंगल्यासमोर आक्रोश, मानधन वाढीचं आश्वासन खोटं?

शासनाकडून पदरात न्याय पडत नसल्यामुळे शेवटी आशांनी सोमवारी (ता.२६) नागपुरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘विजयगड’ या शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर रात्री उशिरापर्यंत आक्रोश आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
Nagpur
Nagpur Esakal

ASHA Workers Strike Nagpur: आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांनी हक्क आणि अधिकारासाठी पंचेचाळीस दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र शासनाकडून पदरात न्याय पडत नसल्यामुळे शेवटी आशांनी सोमवारी (ता.२६) नागपुरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘विजयगड’ या शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर रात्री उशिरापर्यंत आक्रोश आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.


सोमवारी (ता.२६) सकाळपासूनच एक एक आशा आणि गटप्रवर्तकांनी विजयगड बंगल्यासमोर येण्यास सुरुवात केली. शंभर आशा आल्यानंतर त्यांनी आक्रोश केला. यानंतर अचानक संख्या वाढून एक हजारावर आशांनी ठिय्या दिला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना मानधन वाढीसह इतरही गोष्टींचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात शासकीय आदेश निघाला नाही. आदेश काढण्याच्या मागणीसाठी नागपुरात आयटकचे महासचिव श्याम काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.

पोलिसांनी वेळीच बंदोबस्त वाढविल्याने अनुचित प्रकार टळला. मंगला पांडे, मंदा डोंगरे, मंगला लोखंडे, फूलन घुटके, संगीता गौतम, निलीमा गाडरे, सुकेशनी फुलपाटील, समीक्षा गायकवाड, शीतल कळमकर, मोहिनी बालपांडे, पौर्णिमा वासे,ज्योती रक्षित, उषा लोखंडे, प्रीती तलमले यांच्यासह हजारावर आशा, गटप्रवर्तक उपस्थित होते. (Latest Marathi News)

शासनाने दिले होते हे आश्वासन
-आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना २ हजार रुपये दिवाळीपूर्वी भेट मिळणार होती.
-आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मोबदल्यात ७ हजार रुपये वाढ देण्याचे आश्वासन दिले होते.
-गटप्रवर्तकांना मिळणाऱ्या मोबदल्यात १० हजार रुपये वाढ देण्यात येणार होती.

Nagpur
Mohammed Shami Surgery: शमीनं हॉस्पिटलमधील फोटो केले शेअर, नेमकं काय झालंय? सोशल मीडियावर केली भावूक पोस्ट

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तकांना मानधन वाढीसह सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवली. मात्र अध्यादेश काढला नाही. आश्वासन देवून मागे फिरणाऱ्या शासनाचा धिक्कार करीत मागणी पूर्ण होईस्तोवर आंदोलन सुरू राहील. (Latest Marathi News)

-श्याम काळे, महासचिव आयटक.

Nagpur
Rahul Gandhi : 'हिजाब परिधान करणाऱ्या महिलांबद्दल तुम्हाला काय वाटतं?' विद्यार्थ्यीनीच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी म्हणाले, 'महिलांना...'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com