नागपूर : सतरा वर्षीय मुलाचा युवतीवर अत्याचार

अल्पवयीन मुलगा उत्तर प्रदेशातील; बालसुधारगृहात रवानगी
crime
crimeSakal

नागपूर : सोशल मीडियावरून ओळखी झालेल्या मुलाने २३ वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा मुलगा उत्तर प्रदेशातील असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

अल्पवयीन आरोपी उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथील रहिवासी आहे. पीडित तरुणी बुटीबोरी ठाण्यांतर्गत राहते आणि तिचे एमबीए झाले आहे. जून २०२१ मध्ये इंस्टाग्रामवर तरुणीची मुलासोबत ओळख झाली. युवती २१ नोव्हेंबरला आरोपीच्या भावाचे लग्नात सहभागी होण्यासाठी प्रयागराजलाही गेली होती. नंतर दोघेही नागपुरात येत असताना प्रवासादरम्यान दोघांत शारीरिक संबंध झाले. नागपुरात आल्यानंतर आरोपीने गड्डीगोदाम परिसरातील एका हॉटेलमध्ये खोली बुक केली. तेथेही त्याने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

वेळोवेळी तो नागपूरला येत होता आणि धमकावून तरुणीला हॉटेलमध्ये बोलवत होता. मंगळवारी तो चक्क तरुणीच्या घरी पोहोचला आणि गोंधळ घालू लागला. पीडितेने आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पीडितेचा भाऊ आणि वडिलांनी आरोपीला पकडले आणि पोलिसात घेऊन गेले. घटनास्थळ गड्डीगोदाम परिसरात असल्याने हे प्रकरण सदर पोलिसांकडे पाठविण्यात आले. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अल्पवयीनला ताब्यात घेतले. त्याला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

मोबाईल गेमवर जिंकलेल्या पैशांनी पाठवायचा महागड्या भेटवस्तू

अल्पवयीन आरोपी १२ वीचा विद्यार्थी आहे. त्याची आई शिक्षिका आहे. त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसनही असल्याची माहिती मिळाली आहे. वेगवेगळ्या खेळांमध्ये शर्यत लावून त्याने दीड ते दो लाख रुपये कमावले. या पैशातून तो पीडितेला महागड्या भेटवस्तू पाठवत होता. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com