नागपूर : भिक्षेकरू महिलेवर अत्याचार करून खून?

विधानभवनासमोर नग्नावस्थेत आढळला मृतदेह
crime news
crime newsSakal

नागपूर - विधानभवन परिसरासमोर आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास नग्न अवस्थेत भिक्षेकरु महिलेचा डोक्यावर वार करीत, खून केल्याची माहिती समोर आली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली. तिच्यावर अत्याचार करीत खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वर्दळीचा रस्ता असलेल्या विधानभवन समोर आज सकाळच्या सुमारास रक्ताने माखलेल्या अवस्थेत एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान तपासात ही महिला गेल्या ३ ते ४ वर्षांपासून मीठानीम दर्गा या परिसरात भिक्षा मागत असल्याची माहिती समोर आली.

काल रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विधानभवनासमोर असलेल्या बाटा शोरुमसमोर असलेल्या जागेवर ती झोपायची. आज सकाळी तिचा मृतदेह तो नग्न अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे तिच्या बाजूला तुटलेली चप्पल, बांगड्या आणि अंगठी आढळून आली. दरम्यान पोलिसांनी तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केला आहे. पोलिसांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळल्याचे दिसून येत होते.

परिसरात भांडणातून खून झाल्याचा संशय

६० वर्षीय महिला ही मीठानिम दर्ग्याजवळ ३ ते ४ वर्षांपासून ती या परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करायची. याच कारणातून परिसरात असलेल्या इतर भिक्षेकरुंशी तिचे भांडण झाले असावे, असा कयास पोलिसांकडून लावण्यात येत आहे. विशेष म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा घेणारे युवक आणि भिक्षेकरी येतात. त्यांच्याकडून तिच्यावर अत्याचार करीत खून करण्यात आला असावा, अशीही चर्चा परिसरात रंगली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com