

Nagpur Minor Incident
esaklal
नागपूर : शाळेतून घरी परतण्यास उशीर झाल्याने वडिलांनी विचारणा केल्यानंतर १४ वर्षीय मुलाने अपार्टमेंटच्या बाराव्या माळ्याच्या टेरेसवरून उडी घेतल्याची घटना बुधवारी (ता.२३) दुपारी बेलतरोडी परिसरातील पृथ्वीराजनगरात असलेल्या मॅक्स ग्लोरी अपार्टमेंटमध्ये घडली.
गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. निनाद यतींद्र विश्वकर्मा (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निनाद हा अपार्टमेंटच्या ‘ए’ विंगमधील फ्लॅट क्रमांक ६०३ मध्ये राहत होता. तो नववीत शिकत होता.
त्याचे वडील यतींद्र हे खासगी काम करायचे. बुधवारी (ता.२३) शाळेतून घरी येण्यास त्याला सायंकाळी उशीर झाला. त्यामुळे वडिलांनी त्याला उशीर का झाला, तसेच शाळेची बस आणि बॅग कुठे आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी निनादने बॅग ‘सी’ विंगमध्ये राहणाऱ्या मित्र घेऊन गेल्याचे सांगितले.
त्यानंतर काही वेळाने तो इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेला. त्याने बाराव्या माळ्याच्या टेरेसवरून खाली उडी घेतली. पार्किंगमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज वडिलांना आला.
निनादच्या डोक्याला, दोन्ही हातांना आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.