नागपूर खंडपीठाचा ‘ईडीला धक्का’

पीएमएलए कायद्यांतर्गत अटक आरोपीचा जामीन मान्य
Nagpur bench strikes ED
Nagpur bench strikes ED

नागपूर - पीएमएलए कायद्यांतर्गत अटक केलेल्या एका आरोपीचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मान्य केला आहे. अजय कुमार बाहेती (रा. नांदेड) असे या आरोपीचे नाव आहे. गेल्या काही काळात ईडीच्या अनेक प्रकरणांमध्ये जामीन फेटाळले जात असताना या प्रकरणी जामीन मिळाल्याने नागपुरातील सक्तवसुली संचनालयाच्या (ईडी) युनिटसाठी हा धक्का समजला जात आहे.

बाहेतींनी त्यांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर आणि ज्येष्ठ विधिज्ञ देवेन चौहान यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणी न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या जे. सेकर रेड्डी विरुद्ध ईडी या प्रकरणातील निकालाचा दाखला घेतला. अशा गुन्ह्यांमध्ये करण्यात आलेले आरोप वाजवी शंका पलिकडे जाऊन सिद्ध करायला हवेत. मात्र, या प्रकरणी सरकारी पक्ष बाहेतींविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरला आहे, असे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.

..म्हणून ईडीने केली अटक

बाहेती यांच्या जामिन अर्जानुसार, भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून धान्य चोरले जात असून ते बाहेती समुहाच्या मेसर्स इंडिया मेगा ॲग्रो अनाज ली. या कंपनीत नेले जात आहे, अशी माहिती नांदेड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी १८ जुलै २०१८ रोजी या कंपनीवर छापामार कारवाई केली. हे धान्य ५५ कोटी रुपयांना विकले गेल्‍याचे उघड झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com