esakal | Nagpur: बिग बजेट चित्रपटांसाठी पाहावी लागणार वाट
sakal

बोलून बातमी शोधा

film shooting

नागपूर : बिग बजेट चित्रपटांसाठी पाहावी लागणार वाट

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : राज्य शासनाने अखेरच्या टप्प्यात राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांसह चित्रपटगृह सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली. याबाबत आज महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करीत हिरवी झेंडी दाखविली. मात्र, आपल्या आवडत्या कलावंतांचे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटप्रेमींना वाट पाहावी लागणार आहे.

चित्रपट व्यवसाय साखळीवर अवलंबून असल्याने प्रत्यक्षपणे चित्रपटगृह सुरू करणे म्हणावे तेवढी सोपे नाही. या साखळीत चित्रीकरण, वितरण, चित्रपटांचे प्रमोशन आदी अनेक बाबींचा समावेश होतो. ५० टक्क्यांची मर्यादा असल्याने कोणताही चित्रपट निर्माता आपल्या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्याची तूर्तास घाई करणार नाही. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट रिलीज केल्याशिवाय चित्रपटगृह संचालक चित्रपटगृहाचा पडदा प्रेक्षकांसाठी खुला करू शकणार नाहीत.

हेही वाचा: कोळसा संकट ही अफवा, भारत पॉवर सरप्लस देश; सीतारामण यांचा दावा

शिवाय, कोरोनाने एन्ट्री घेतल्यानंतर या व्यवसायाशी निगडित असणाऱ्या प्रत्येकाला फटका बसला. यामुळे, आर्थिक बाजूचा विचार करीत एकाएकी पैसा ओतणे प्रत्येकाला शक्य होणार नाही. तर, प्रेक्षकांच्या संख्येवर बंधन घालण्यात आल्याने चित्रपटगृहाच्या रोजच्या देखभालीवर भांडवलस्वरूपी पैसा गुंतविणे संचालकांना शक्य नाही.

५० टक्के प्रेक्षक संख्या ठेवल्याने अडचणी अद्याप कायम आहेत. चित्रपटगृहामध्ये १०० टक्के प्रेक्षकांना परवानगी मिळाल्याशिवाय बड्या बॅनरचे चित्रपट रिलीज होण्याची शक्यता फार कमी आहे. चित्रपटगृह वगळल्यास आज सर्व काही सुरू झाले. शहरामध्ये रुग्णांची संख्यादेखील आवाक्यात असून, लसीकरण जोरात सुरू आहे. व्यवसायाला दीड वर्ष फटका सहन करावा लागला असल्याने प्रशासनाने १०० टक्के प्रेक्षक संख्येला परवानगी द्यायला हवी.

-प्रतीक मुणोत, संचालक, पंचशील सिनेमा, नागपूर

शहरामध्ये एकूण २८ स्क्रीन

सिंगल क्रीन चित्रपटगृह : ९

मल्टीप्लेक्स : ५ (१९ पडदे)

हेही वाचा: मोदींनी केला दहा लाख कोटींच्या गतीशक्ती योजनाचा शुभारंभ

..तर उत्पन्नसुद्धा ५० टक्केच

बिग बजेट आणि तगडी स्टार कास्ट असणारे चित्रपट शुक्रवार, शनिवार, रविवारची या तीन दिवसांमध्ये ५० कोटी रुपयांची कमाई करतात. पहिल्या आठवड्यात १०० कोटी आणि एकूण स्क्रीनिंगच्या काळात २०० कोटी रुपयांची अपेक्षा त्यांना त्यांच्या निर्मित चित्रपटाकडून असते. ५० टक्यांची मर्यादा असल्याने पहिल्या आठवड्यामध्ये फक्त ५० कोटी रुपये कमाई होण्याची भीती या चित्रपट निर्मात्यांना आहे. अशा परिस्थितीमध्ये चित्रपट रिलीज करण्याची हिंमत निर्मात्यापासून ते वितरकांपर्यंत कोणीही करणार नाही.

loading image
go to top