Nagpur Bike Theft: स्वतःचे वाहन पार्किंगमध्ये लावून दुचाकीची करायचे चोरी, २२ वाहने चोरणारी टोळी गजाआड

स्वतःचे वाहन पार्किंगमध्ये लावून बनावट चावीने दुसऱ्याचे वाहन चोरून नेत मध्यप्रदेशात विक्री करणाऱ्या तिघांना धंतोली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २२ वाहने जप्त केली.
Nagpur News
Nagpur News Esakal

Nagpur Vehicle Theft: स्वतःचे वाहन पार्किंगमध्ये लावून बनावट चावीने दुसऱ्याचे वाहन चोरून नेत मध्यप्रदेशात विक्री करणाऱ्या तिघांना धंतोली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २२ वाहने जप्त केली.

अतुल शामलाल बिसेन, सौरभ दिलीप मासुरकर आणि सोनू ऊर्फ ऋषभ दिलीप मासुरकर (सर्व रा. बालाघाट, मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पार्किंगच्या ठिकाणावरून दुचाकी चोरीला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, काही जण दुचाकी लावून दुसऱ्या दुचाकी चोरून नेत असल्याची बाब समोर आली.

त्यामुळे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक कोळी, सहायक पोलिस निरीक्षक संकेत चौधरी, पोलिस हवालदार सुभाष वासाडे, शिपाई बाळू जाधव, अंमलदार विनोद चव्हाण, हरीश कामडी, माणिक दहिफळे, वृषभ निशितकर, विक्रम ठाकूर यांनी सोमवारी अतुल बिसेन याला अटक केली. तो सौरभ आणि ऋषभ यांच्या मदतीने चोरी केलेल्या वाहनांची विक्री करीत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्यांच्याकडून २२ दुचाकी वाहने जप्त केली.

पोलिस आयुक्तांकडून सन्मान

धंतोली पोलिसांकडून करण्यात आलेल्या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सत्कार केला. यावेळी धंतोली ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह अंमलदार यांना बोलावून घेत, त्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देण्यात आले.

Nagpur News
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीचा पत्नीसोबतचा वाद अखेर मिटला; आलिया म्हणाली, "ऑप्शन नाहीये..."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com